WFI Elections 2023 : भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी निवड झाली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
ब्रिजभूषण सिंह हे कुस्ती महासंघात नसले तरी अध्यक्षपद मात्र त्यांच्या गटाकडे आले आहे. आज झालेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले आहेत. संजय सिंह 2008 मध्ये वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बनले होते. 2009 मध्ये जेव्हा उत्तर प्रदेश कुस्ती संघाची स्थापना झाली तेव्हा ब्रिजभूषण सिंह प्रदेशाध्यक्ष आणि संजय सिंह उपाध्यक्ष झाले होते.
X Down : मस्कचं X कोलमडलं! जगभरातील करोडो यूजर्सची टाईमलाईन Empty
कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्णपदक विजेती अनिता शेओरान यांच्याशी संजय सिंह यांची लढत झाली. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ आरोप कुस्तीपटूंचा शेओरान यांना पाठिंबा होता. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह अनेक अव्वल कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतर येथे निदर्शने केली होती.
निवडणुकीला उशीर का झाला?
WFI च्या निवडणुकीची प्रक्रिया जुलैमध्येच सुरू झाली होती, परंतु प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यास विलंब झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने घातलेल्या निवडणुकीवरील बंदी फेटाळली होती. यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.