Download App

शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा डाव सावरला

Shardul Thakur : शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण देशांतर्गत सामन्यांमध्ये तो चमकदार कामगिरी करत आहे. शार्दुलने रणजी ट्रॉफी 2023-24 च्या (Ranji trophy 2023-24) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या आहेत. शार्दुलच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा पार केला. चांगली फलंदाजी करण्यापूर्वी शार्दुलने गोलंदाजीतही कमाल दाखवली होती. त्याने 14 षटकात 2 विकेट घेतल्या.

रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या 5 धावा करून बाद झाला. यानंतर भूपेन लालवानीही लवकर तंबूत परतला. मुंबईचा संपूर्ण संघ ढेपाळला होता. पण शार्दुलने डाव सावरला. तो 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

धर्मशाला कसोटीपूर्वीच भारत नंबर वन होणार? ऑस्ट्रेलियाच्या विजयावर गणित ठरणार

यात त्याने 105 चेंडूंचा सामना करताना 109 धावा केल्या. त्याने 13 चौकार आणि 4 षटकार मारले. या शानदार खेळीनंतर शार्दुल बाद झाला. त्याला कुलदीप सेनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

कर्णधार अजिंक्य रहाणेलाही विशेष काही करता आले नाही. 67 चेंडूत 19 धावा करून तो बाद झाला. रहाणेने 2 चौकार मारले. मुशीर खानने अर्धशतक झळकावले. त्याने 131 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. मुशीरच्या या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेने 92 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. त्याने 3 चौकार मारले.

Lok Sabha Election : भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला का वगळले?

या सामन्यात तामिळनाडूचा संघ 146 धावांवर ऑलआऊट झाला होता. वॉशिंग्टन सुंदरने 43 धावा केल्या होत्या. सुंदरच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. यादरम्यान शार्दुलने मुंबईसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने 14 षटकात 48 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. शार्दुलने 4 मेडन षटके टाकली. तुषार देशपांडेने 3 विकेट घेतल्या.

follow us