Shooter Manu Bhaker : मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. (Manu Bhaker) त्याच्याशिवाय या पुरस्कारासाठी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी T64 गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रवीण कुमार याचंही नाव पाठवण्यात आलं आहे.
यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे पॅरिसमध्ये दोन कांस्यपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या नेमबाज मनू भाकरचं नाव या यादीत नाही. २२ वर्षीय मनू भाकरने या पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला नव्हता. पण, तिच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने मनूने तिचा अर्ज पाठवल्याचं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामासुब्रमणियम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने ही दोन नावं सुचवली आहेत.
Paris Olympics 2024 मनू भाकर करणार पदकांची हॅटट्रिक? शानदार कामगिरी करत पुन्हा फायनलमध्ये
या समितीने अर्जुन पुरस्कारासाठी ३० खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे. त्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकसमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू अमन सेहरावत याचेही नाव आहे. शिवाय स्वप्नील कुसाळे व सरबज्योत सिंग या कांस्यपदक विजेत्या नेमबाजांचीही नावं अर्जुन पुरस्कारासाठी सुचवली आहेत. सरबज्योतने मनूसह नेमबाजीच्या मिश्र सांघिक गटाचे कांस्यपदक जिंकले होते. भारताच्या पुरुष हॉकी संघातून जरमनप्रीत सिंग, संजय राणा, राजकुमार पाल, अभिषेक नैन व सुखजीत सिंग यांचीही या यादीत नावं आहेत.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नवदीप सिंग (पॅरा ॲथलेटिक्स), धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स), अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स), सचिन खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स), प्रणव सूरमा (पॅरा ॲथलेटिक्स) यांचा समावेश आहे. ऍथलेटिक्स), प्रीती पाल (पॅरा ऍथलेटिक्स), सिमरन (पॅरा ऍथलेटिक्स), होकातो होतोझे सेमा (पॅरा ॲथलेटिक्स), दीप्ती जीवनजी (पॅरा ॲथलेटिक्स), नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन), मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन), तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन), नित्या सिवन (पॅरा बॅडमिंटन), मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी), रुबिना फ्रान्सिस (पॅरा बॅडमिंटन). पॅरा शूटिंग), कपिल परमार (पॅरा ज्युडो) आणि राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी) या १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
भारताचे पॅरा स्विमर मुरलीकांत पेटकर यांनी १९७२च्या हिडलबर्ग पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्काराच्या जीवनगौरव गटासाठी केली गेली आहे. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सुभाष राणा यांच्या नावाची शिफारस केली गेली आहे. त्यांनी अवनी लेखरा, मनीष नरवाल, रुबिना फ्रांसिस आणि मोना अगरवाल यांना मार्गदर्शन केले आहे.