भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Subhuman Gill) सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) तुफानी खेळ करत आहे. आयपीएलमध्ये, सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिलने हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. गिलच्या झंझावाती शतकामुळे गुजरात संघ आयपीएल 2023 च्या मोसमातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. (Indian team’s star opener Shubman Gill is currently having a blast in the Indian Premier League (IPL 2023).
4 महिन्यांत झळकावली 6 शतके :
2023 हे वर्ष गिलसाठी आतापर्यंत जबरदस्त ठरले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 5 शतके झळकावली आहेत. यात त्याच्या एकदिवसीय सामन्यातील द्विशतकाचाही समावेश आहे. गिलने यावर्षी वनडेमध्ये 3 शतके (1 द्विशतकासह) झळकावली आहेत. यासोबतच कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही 1-1 शतक ठोकले. त्यानंतर आता आयपीएलमध्येही गिलने शतक ठोकले आहे.
अशाप्रकारे, जबरदस्त फॉर्मच्या जोरावर गिलने ५ महिन्यातच सहावे शतक झळकावले आहे. दरम्यान, या तुफानी खेळीने गिलने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आपला दावा मजबूत केला आहे. या शतकांच्या जोरावर गिलने विश्वचषकात दमदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचं सांगितलं आहे. गिलचा हा दमदार फॉर्म विश्वचषकातील उर्वरित संघांसाठीही धोक्याचा इशारा आहे.
गिलचे यंदाचे आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल रेकॉर्ड :
या वर्षी शुभमन गिलने एकूण १७ आंतरराष्ट्रीय (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) सामने खेळले आहेत. यात त्याने 5 शतके ठोकली आणि 61.25 च्या सरासरीने 980 धावा केल्या. वनडेमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 208 धावा आहे. तसेच, चालू आयपीएल हंगामात, गिलने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 48 च्या सरासरीने 576 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.