मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीने टी-20 क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुबमन गिलने (Shubman Gill) मोठी झेप घेतली आहे. गिल तब्बल 168 स्थानांची झेप घेत 30 व्या स्थानी पोहचला आहे.
या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या खात्यात 906 गुण जमा आहेत. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात शतक ठोकणाऱ्या शुभमन गिलने यादीत मोठी झेप घेतली आहे. क्रिकेट कारकिर्दीतील हे त्याचं बेस्ट रँकिंग ठरली आहे.
क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम करणारा शुबमन गिल (Shubman Gill) एकदिवस क्रमवारीत सहाव्या तर कसोटी क्रमवारीत 62 व्या स्थानावर आहे. आता टी-20 क्रमवारीतही त्याने मोठी झेप घेत तो 542 गुणांसह तिसाव्या स्थानी पोहचला आहे. कारकिर्दीतले हे त्याचे सर्वोत्तम स्थान आहे.
त्याच्या बरोबर भारतीय टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सुद्धा मोठी झेप घेतली आहे. पांड्या 250 गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
IND vs AUS: ‘हा’ ठरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा यशस्वी कर्णधार
दुसरीकडे टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh)गोलंदाजाच्या यादीत 13 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे गोलंदाजांच्या टॉप 10 यादीत एकही भारतीय नाही. फलंदाजांबाबत सांगायचं झाल्यास, विराट कोहलीला (Virat Kohali) एका अंकाचं नुकसान सहन करावं लागलं असून त्याची 15 व्या स्थानावर घसरण झाली. तर के एल राहुल (KL Rahul) 27 आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 29 व्या स्थानावर कायम आहे. इशात किशनच्या (Ishan Kishan)रेटिंग पॉईंटमध्येही घसरण झाली असून तो 48 व्या स्थानावर फेकला गेला आहे.