SL vs AFG : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी 20 सामन्याच्या (SL vs AFG) मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेने विजयाची नोंद केली. या विजयानंतर मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka vs Afghanistan) अफगाणिस्तानवर 72 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानसमोर 188 धावांचे टार्गेट होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानचे फलंदाज श्रीलंकेच्या धारदार गोलंदाजीपुढे फार काळ टिकू शकले नाहीत. 17 ओव्हरमध्ये 115 धावांवर अफगाणिस्तानचा डाव आटोपला. या सामन्यात श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने (Angelo Mathews) जबरदस्त कामगिरी केली.
श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा ! आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावरील बंदी आयसीसीने उठवली
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 188 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाहीत. सुरुवातीलाच दोन झटके बसले. दोन तीन फलंदाज वगळता कुणाला विशेष काही करता आले नाही. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने 2 ओव्हरमध्ये 9 धावा देत दोन विकेट घेतल्या. तर बिनुर फर्नांडो, कर्णधार वानिंदू हसरंगा (Wanindu Hasarange) आणि मथीथा पथिराणा या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. महीश तीक्षणा आणि दासून शनाका या दोघांनी 1-1 विकेट घेत त्यांना साथ दिली.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या सदीरा समरविक्रमा आणि अँजेलो मॅथ्यूज या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 42 धावा केल्या. तर सदीरा 51 धावांवर बाद झाला. यानंतर वानिंदू हसरंगा 22, कुसल मेंडिस 23 आणि पाथूम निसांकाने 25 धावा केल्या. यानंतर आता तिसरा सामना 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या दृष्टीने हा सामना औपचारिकतेचा राहिला आहे. पराभव झाला तरी फरक पडणार नाही. तर दुसरीकडे अखेरचा सामना जिंकून मालिकेत एक तरी सामना जिंकण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहणार आहे.
सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान फसला? रोहितच्या फलंदाजीमुळे वाद, जाणून घ्या, नियम
दरम्यान, श्रीलंकेत आर्थिक संकट आले होते. त्याचबरोबर श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी खराब झाली. वर्ल्डकपमध्ये भारताने लंकेचा दारुण पराभव केला होता. लंकेचा संघ भारताविरुद्ध अवघ्या 55 धावांत गारद झाला होता. या सामन्यात लंका तब्बल 302 धावांनी पराभूत झाली होती. त्यामुळे श्रीलंकेचे क्रीडामंत्री अर्जुन रणतुंगाने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. तर रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम कमेटी तयार करण्याचा प्रयत्न केला होता.