Download App

South Africa Playing XI WTC Final: दक्षिण आफ्रिका तयार, WTC Final साठी प्लेइंग-11 जाहीर

South Africa Playing XI WTC Final: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 11 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या

  • Written By: Last Updated:

South Africa Playing XI WTC Final : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 11 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायलनसाठी दक्षिण आफ्रिकाने (South Africa) आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे. उद्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia)  लॉर्डसच्या (Lord’s) ऐतिहासिक मैदानावर दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने (Temba Bavuma) प्लेइंग 11 जाहीर केली आहे.

अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून डावाची सुरुवात  एडन मार्कराम आणि रायन रिकेलटन करणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर वियान मडलरला संधी देण्यात आली आहे. तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार टेम्बा बावुमा फलंदाजीसाठी येणार आहे. तर पाचव्या क्रमांकावर  टायस्टन स्टब्स आणि डेव्हिड बेडिंगहॅम सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार आहे. तर या सामन्यात काइल व्हेरिन यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे. मोर्को जानसेन, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी फास्ट गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. केशव महाराज फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करणार असून त्याला एडन मार्कराम साथ देणार आहे. तर दुसरीकडे आता या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन:

एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायलनसाठी ऑस्ट्रेलिया संघ:

उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टाझा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलंड, नॅथन लायन, मॅट कुह्नेमन.

राखीव खेळाडू: ब्रेंडन डॉगेट.

follow us