Download App

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेला दुहेरी झटका; ‘हे’ दोन प्रमुख खेळाडू संघातून बाहेर

ICC Mens Cricket World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या वनडे वर्ल्ड कप जिंकण्यांच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खिया (Enrich Norkhia)आणि सिसांडा मगाला (Sisanda Magala)यांना फिटनेस टेस्ट पास करता आली नाही. त्यामुळे हा दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa team)संघाला मोठा धक्का मानला जात आहे.

भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?

एनरिच नॉर्खियाला पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याचबरोबर सिसांडा मागाला देखील गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रका संघाला दुहेरी झटका बसला आहे. नॉर्खियाला यापूर्वीही 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतून अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती.

एनरिच नॉर्खिया आणि सिसांडा मगाला या दोघांनाही संघातून वगळल्याने आता त्यांच्या जागी अष्टपैलू खेळाडू अँडिले फेहलुकवायो आणि गोलंदाज लिझाड विलियम्स यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अँडिले फेहलुकवायो हा अष्टपैलू खेळाडू 76 वनडे सामने खेळला आहे. त्यात त्याच्या नावावर 89 विकेट आहेत. दक्षिण आफ्रिका 7 ऑक्टोबरला दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेशी भिडणार आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 चे सामने येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

फेहलुकवायो याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वन डे सामने खेळले आहेत. त्याने त्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामध्ये फेहलुकवायोने निर्णायक पाचव्या वन डे सामन्यात 19 बॉलमध्ये 38 रण केले होते. आफ्रिकेच्या संघामध्ये कागिसो रबाडा, मार्को येन्सन, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी हे जलदगती गोलंदाज आहेत.

वनडे वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ पाहूया. दक्षिण आफ्रिकेचा सुधारित संघ – टेम्बा बवुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेड्रींक्स, मार्को येन्सन, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिल फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, लिझाड विलियम्स

Tags

follow us