Download App

टीम इंडिया फेल! पहिल्याच टी 20 सामन्यात विंडीज संघाने मिळवला दणदणीत विजय

IND vs WI : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करत मालिका विजय साकारणाऱ्या टीम इंडियाची टी-20 मालिकेतील सुरुवात खराब राहिली. पहिल्याच सामन्यात विंडीज संघाकडून दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. वेस्टइंडिज संघाने विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

https://letsupp.com/sports/west-indies-caption-rovman-powell-story-how-he-faces-situation-in-his-life-74978.html

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिज संघाने 150 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला फक्त 145 धावा करता आल्या. या सामन्यात विंडीज संघाने जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या पावर प्ले मध्ये संघाचे 54 रन झाले होते. भारतीय गोलंदाज निष्प्रभ दिसत होते. या सामन्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दोघेही होते. मात्र ते फार काही करू शकले नाहीत. कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 20 रन देत एक विकेट मिळवली. चहलला दोन विकेट मिळाल्या.

भारतीय संघाकडून तिलक वर्मा याने शानदार फलंदाजी केली. त्याने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या सामन्यात तो चांगल्या स्ट्राइक रेटने फलंदाज ठरला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. सलामीवर शुभमन गिल आणि इशान किशन फेल ठरले. त्यामुळे संघाला आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

IND vs WI : टीम इंडिया सुसाट! तिसऱ्या वनडेत मोठा विजय, मालिकाही जिंकली

 

Tags

follow us