चांद्रयानाच्या यशानंतर आणखी एक गुडन्यूज! भारताने आयर्लंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली

IND vs IRE : भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मालिकेतील हा अंतिम सामना होता. त्यामुळे टीम इंडियाने (Team India) ही मालिका जिंकली आहे. सतत पाऊस सुरू असल्याने तिसऱ्या सामन्याची नाणेफेक देखील करता आली नाही. पाऊस आता काही थांबणार नाही हे लक्षात […]

Jasprit Bumrah

Jasprit Bumrah

IND vs IRE : भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मालिकेतील हा अंतिम सामना होता. त्यामुळे टीम इंडियाने (Team India) ही मालिका जिंकली आहे. सतत पाऊस सुरू असल्याने तिसऱ्या सामन्याची नाणेफेक देखील करता आली नाही. पाऊस आता काही थांबणार नाही हे लक्षात येताच पंचांनी तिसरा सामना रद्द केला. दरम्यान, कालच भारताने अवकाशात मोठी कामगिरी केली. चांद्रयान (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला.

तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे आयर्लंडसाठी हा सामना करो या मरो असाच होता. या सामन्यासाठी संघाने पूर्ण तयारीही केली होती. परंतु, सामना सुरू झालाच नाही. कारण, याठिकाणी प्रचंड पाऊस सुरू होता. बुधवारी रात्री 9 वाजता सामना सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र पाऊस काही थांबला नाही. रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली. पण, पाऊस लवकर थांबण्याची चिन्हे नव्हती. अखेर पंचांनी हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली.

या मालिकेत भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चमकदार कामगिरी केली. दोन सामन्यात त्याने 77 धावा केल्या. पहिल्या सामन्या 19 तर दु्सऱ्या सामन्या अर्धशतकी खेळी केली.

बुमराह प्लेअर ऑफ सिरीज

या संपूर्ण मालिकेत गोलंदाजांचा प्रभाव राहिला जसप्रीत बुमराहने 4.88 च्या सरासरीने 4 विकेट घेतल्या. त्याने दोन सामन्यात प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. मागील 11 महिन्यांपासून तो संघाबाहेर होता. त्यामुळे या मालिकेतील त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. या मालिकेत बुमराहला प्लेअर ऑफ सिरीज पुरस्कार मिळाला. या मालिकेत रवि बिष्णोई आणि प्रसिद्ध कृष्ण या दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.

Exit mobile version