चक दे इंडिया! पाकिस्तानला लोळवत आशिया चषकावर कोरलं नाव

IND vs PAK Hockey : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द झाला त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. तरीही भारत जिंकल्याचा आणि पाकिस्तावर विजय मिळवल्याचा आनंद देशवासियांना साजरा करता आला. होय, पण हे घडलं हॉकीच्या मैदानात. भारतीय हॉकी (IND vs PAK Hockey) संघाने पाकिस्तानला लोळवून पुरुष हॉकी फाइव्ज आशिया चषकावर नाव कोरले. या […]

Hockey

Hockey

IND vs PAK Hockey : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द झाला त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. तरीही भारत जिंकल्याचा आणि पाकिस्तावर विजय मिळवल्याचा आनंद देशवासियांना साजरा करता आला. होय, पण हे घडलं हॉकीच्या मैदानात. भारतीय हॉकी (IND vs PAK Hockey) संघाने पाकिस्तानला लोळवून पुरुष हॉकी फाइव्ज आशिया चषकावर नाव कोरले.

या स्पर्धेतील अंतिम सामनाही रोमहर्षक असाच होता. पॅनल्टी शूटआउटमध्ये गोल कर पाकिस्तानला पराभूत करत भारताने विजय नोंदवला. अर्धा सामना होईपर्यंत पाकिस्तानचा संघ आघाडीवर होता. त्यानंतर मात्र भारतीय संघाने लौकिकाला साजेशी खेळी करत दमदार पुनरागमन केल. डावाच्या शेवटपर्यं पाकिस्तानशी बरोबरी साधत राहिला.

एकावेळी दोन्ही संघांचे 4-4 असे समसमान गुण झाले. त्यानंतर पेनल्टी शूटआउट प्रकारात भारतीय संघाकडून मनिंदर सिंह आणि गुरज्योत सिंह यांनी गोल करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

गोलकीपर सूरज करकेरा याने पाकिस्तानकडून केले गेलेले दोन गोल रोखले. या विजयानंतर भारताने एफआयएच पुरुष हॉकी फाइव्ज वर्ल्डकप 2024 मध्ये प्रवेश केला. याआधी भारतीय संघाने सेमी फायनल सामन्यात मलेशियाचा 10-4 अशा गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

 

Exit mobile version