Pakistan National Cricket Team : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan National Cricket Team) एका पाठोपाठ निर्णय घेतले जात आहेत. बोर्डाने दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांना हेड कोच नियुक्त करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानंतर क्रिकेट बोर्डाने आणखी एक धाडसी निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या संपूर्ण मेडिकल विभागाला बरखास्त करून टाकले आहे.
डायरेक्टर ऑफ मेडिकल अँड स्पोर्ट्स सायन्सेस विभागाचे मुख्य डॉक्टर सोहेल सलीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या संपूर्ण विभागाला हटवण्यात आले आहे. नवीन भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल यासाठी एक समिती नियुक्त करण्यात येईल. निवड प्रक्रिया सांभाळण्याचे काम या समितीकडे असेल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.
पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू मागील काही दिवसांपासून दुखापतींचा सामना करत आहेत. नसीम शाह, शाहीन आफ्रिदी आणि हारिस रऊफ यांच्यासारखे गोलंदाज जखमी झाले होते. यानंतर संघात पुन्हा वापसी केल्यानंतरही अनेक दिवसांपासून हे खेळाडू दिसले नाहीत. काही खेळाडू तर अजूनही पूर्णपणे संघात सहभागी झालेले नाहीत. याचा फटका पाकिस्तान संघाला बसणार आहे.
Pakistan Team : टीम इंडियाच्या विश्वचषकाचा ‘हिरो’, पाकिस्तानचा हेड कोच; PCB ने केलं कन्फर्म
या खेळाडूत एक खेळाडू असाही आहे ज्याने एक वर्षानंतरही संघात वापसी केलेली नाही. पीसीबीने याचा हवाला देत संपूर्ण मेडिकल टीमलाच बरखास्त केले आहे. संघातील युवा गोलंदाज 2023 मध्ये दुखापतग्रस्त झाला होता. आता त्याच्या या दुखापतीला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही तो संघात वापसी करू शकलेला नाही. पीसीबीचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रकार म्हणजे मेडिकल विभागाचा हलगर्जीपणा आहे. या खेळाडूवर वेळेवर उपचार केले नाहीत. जे उपचार केले ते देखील व्यवस्थित झाले नाहीत. यामुळे हा खेळाडू अजूनही बरा होऊ शकला नाही.
मेडिकल विभागाच्या या निष्काळजीपणाचा फटका संघातील मुख्य गोलंदाजांना बसत आहे. संघातील आघाडीचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी अजूनही त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये आलेला नाही. दुखापतग्रस्त होण्याआधी तो 140 पेक्षा जास्त गतीने चेंडू टाकायचा. पण दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच्या गोलंदाजीचा वेग कमी झाला आहे. नसीम शाह यालाही दुखापतीतून बरे होण्यासाठी सहा महिन्यांचा काळ लागला. ज्यामुळे त्याला वनडे विश्वचषकात खेळता आले नाही. हारिस राऊफही अडखळत खेळताना दिसतोय.
T20 World Cup 2024 सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का, ICC ची ‘ही’ चूक पडू शकते महागात