Download App

“मी निवृत्ती घेतलेली नाही, खेळतच राहणार”; स्टार खेळाडूनं स्पष्टच सांंगितलं..

दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनेही निवृत्ती घेतल्याची होती. मात्र, यात काहीच तथ्य नसल्याचे स्वतः मिलरनेच स्पष्ट केले आहे. 

David Miller : टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा (T20 World Cup) संघ निराशेच्या गर्तेत ढकलला गेला आहे. या सामन्यातील पराभवानंतर आफ्रिका संघावरील (IND vs SA) चोकर्सचा शिक्का पुन्हा कायम राहिला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा (Team India) सात धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर टीम इंडियातील स्टार फलंदाज विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने निवृत्तीची घोषणा केली. या नंतर दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरनेही (David Miller) निवृत्ती घेतल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चात काहीच तथ्य नसल्याचे स्वतः मिलरनेच स्पष्ट केले आहे.

एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची ‘टी 20’मधून निवृत्ती

डेव्हिड मिलरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे आफ्रिका संघाच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाल आहे. यानंतर या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्वतः मिलरनेच सांगितलं आहे. मिलरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहिली आहे. यात त्याने निवृत्तीच्या चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळल्या आहेत. मी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. मी दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेट खेळणं सुरुच ठेवणार आहे. मला अजून सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.

सूर्याने मिलरचा कॅच घेतला अन् आफ्रिकेने सामनाच गमावला

दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंह (Arshadeep Singh) आणि जसप्रित बुमराहच्या चार-चार ओव्हर टाकून झाल्या होत्या. त्यामुळे शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देण्यात आली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने डेव्हिड मिलरला तंबूत धाडलं. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने जोरदार शॉट मारला. मात्र थेट बाउंड्रीजवळ सूर्यकुमार यादवने अफलातून झेल घेतला. हाच सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतरही हार्दिक पांड्याने चिवट गोलंदाजी करत फक्त 8 धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

WTC Final Ind vs Aus: विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ आमनेसामने, कोण मोडणार? रिकी पाँटिंगचा विक्रम

वेगवान गोलंदाज अर्शदीपनेही सामन्यात चिवट गोलंदाजी केली. त्याने फेकलेल्या चेंडूंवर आफ्रिकेचे फलंदाज अडखळताना दिसत होते. आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम पॉवर प्लेच्या आत बाद झाला. अर्धशतकाकडे वाटचाल करत भारतासाठी धोकादायक ठरू लागलेला डिकॉकही तंबूत परतला. अर्शदीपने त्याच्या चार ओव्हर्सच्या स्पेलमध्ये फक्त 20 रन देत दोन महत्वाच्या विकेट मिळवून दिल्या. क्विंटन डिकॉकची घेतलेली विकेटही टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली.

follow us

वेब स्टोरीज