ICC T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकासाठी सर्वच क्रिकेट संघांची घोषणा झाली (ICC T20 World Cup 2024) आहे. जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच 20 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.आयसीसीने या स्पर्धांची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा करण्यात आली. आता पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंचा आवाज कॉमेंट्रीच्या माध्यमातून एकायला मिळणार आहे. या कॉमेंट्री पॅनलमध्ये माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्री, सुनील गावस्कर यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकरांतून नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा दिनेश कार्तिक यंदा कमेंट्री करताना दिसणार आहे.
T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर
मुख्य कॉमंटेटर मध्ये रवी शास्त्री, इयान स्मिथ, मेल जॉन्स, हर्षा भोगले, इयान बिशप यांचा समावेश आहे. पूर्व विश्वकप विजेता रिकी पाँटिंग, मॅथ्यू हेडन, इयोन मॉर्गन, टॉम मुडी आणि वसीम अक्रम यांचा समावेश आहे. कॉमेंट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्यांमध्ये अमेरिकी कॉमंटेटर जेम्स ओ ब्रायनचा समावेश आहे.
डेल स्टेन, ग्रॅमी स्मिथ, मायकल एथरटन, वकार युनिस, सिमोन डोउल, शॉन पोलॉक आणि केटी मार्टिन, एमपूमेलेलो एमबांग्वा, नटाली जर्मानोस, डॅनी मॉरिसन, अलीसन मिचेल, एलन विलकिन्स, ब्रायन मुर्गाट्रोयड, माईक हॅसमॅन, इयान वॉर्ड, अथर अली खान, रसेल अर्नाल्ड, नियाल ओ ब्रायन, कासा नायडू आणि वेस्टइंडीजचा माजी कर्णधार डेरेन गंगा यांचा समावेश आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धा पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये (T20 World Cup 2024 ) होणार आहे. या स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामने होणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सराव सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. हा सामना अमेरिकेत होईल. या सामन्याची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.
T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम