Pro Hockey League : भारतीय पुरुष हॉकी संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत (Pro Hockey League) विश्वविजेत्या जर्मनी संघाला एफआयएच प्रो लीग स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-0 अशा फरकाने पराभव केला. ली व्हॅली हॉकी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंहने सोळाव्या, सुखजित सिंगने 41 व्या तर गुरजंत सिंगने 44 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात जर्मनी संघात नवोदितांचा भरणा होता. या खेळाडूंनीही आक्रमक खेळ केला. मात्र भारतीय संघाच्या नियोजित खेळीपुढे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
हॉकीतही ऑस्ट्रेलिया बलाढ्य! पहिल्याच सामन्यात गोलवर्षाव करत केला भारताचा पराभव
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. सुखजित सिंग आणि मनदीप सिंग यांनी काही संधी निर्माण केल्या. गोलकीपर पीआर श्रीजेशने जर्मनीच्या पेनल्टी कॉर्नरप्रसंगी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे जर्मनीला गोल करता आला नाही. गोंजालो पेलाइटने जोरदार फ्लिक केले पण श्रीजेशने उजवा हात पुढे करून जबरदस्त बचाव केला. हाच क्षण भारतीय संघाच्या विजयात मोलाचा ठरला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने चांगलं यश मिळवलं. कर्णधार हरमनप्रीत सिंगने जर्मन कीपर अलेक्जेंडर स्टॅडलरच्या डाव्या बाजूला निशाणा साधत गोल केला. मिडफिल्डमध्ये हार्दिक सिंहने सर्कलमध्ये शानदार कामगिरी केली. त्यानंतर सुखजित सिंगने 41 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली. अभिषेकने चेंडू पास केला. पुढे तीन मिनिटांनंतर गुरजंत सिंगने तिसरा गोल करत भारताला विजयी आघाडी मिळवून दिली.
तिसरा क्वार्टर संघाच्या दृष्टीने जास्त महत्वाचा होता. यावेळी भारताने आघाडी घेतली होती. 0-3 अशा पिछाडीनंतर जर्मन खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. भारताच्या गोलक्षेत्रात त्यांनी प्रवेशही केला. मात्र गोलकीपर श्रीजेशने शानदार कामगिरी केली. भारताचा पुढील सामना ८ जून रोजी होणार आहे. तसेच ग्रेट ब्रिटेनविरुद्ध आज आणि 9 जून रोजी सामना होणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघ आपली विजयी कामगिरी अशीच सुरू ठेवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Asian Games : अंतिम फेरीत जपानचा पराभव; 9 वर्षांनी भारतीय हॉकी संघाची ‘सुवर्ण’ मोहोर