Download App

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? BCCI ने दिली महत्वाची अपडेट

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषकाबाबत मोठी (T20 World Cup) बातमी समोर आली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार याची माहिती भारतीय क्रिकट नियामक मंडळाने (BCCI) दिली आहे. सध्या भारतात टी 20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा 26 मे रोजी संपणार आहेत. या स्पर्धा संपल्यानंतर पाच दिवसांनंतर टी 20 वर्ल्डकप सुरू होणार आहे. 1 जून ते 29 जून या काळात वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जवळपास 20 देशांचे क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. टी 20 लीग हंगामादरम्यानच भारतीय संघाची घोषणा होईल अशी माहिती मिळाली आहे. आगामी टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियातील 15 जणांची निवड एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा

टी 20 वर्ल्डकपसाठी आयसीसीने क्रिकेट संघांच्या घोषणेसाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. सर्व संघांना 1 मेच्या आधी संघांची घोषणा करावी लागणार आहे. तसेच या पंधरा जणांच्या संघात एखादा बदल करायचा असेल तर त्यासाठी 25 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पीटीआयनुसार, टी 20 लीगचा पहिला टप्पा संपल्यानंतर निवड समिती भारतीय संघाच्या 15 जणांची निवड करू शकते.

या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की जे संघ टी 20 लीगमधील प्ल ऑफ फेरीत पोहोचणार नाहीत त्यातील निवडले गेलेले खेळाडू अमेरिकेला रवाना करण्यात येतील. या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात काही राखीव खेळाडूही असतील. निवड समितीकडून सध्या टी 20 लीग स्पर्धांवर लक्ष ठेवले जात आहे. या स्पर्धांचा पहिला टप्पा उरकल्यानंतर टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडीसाठी हालचाली सुरू केल्या जातील. यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. यंदा प्रथमच जास्त संख्येत क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Davis Cup साठी तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तानात; केंद्र सरकारने दिली परवानगी

follow us