T20 World Cup 2024 : अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने टी 20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात (T20 World Cup 2024) झाली आहे. या पहिल्याच सामन्यात अमेरिकेने जबरदस्त खेळ करत कॅनडाला पराभवाची धूळ चारली. टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात अमेरिका संघाचा हा पहिलाच विजय होता. तसेच या सामन्यात चौकार आणि षटकारांचा थरार पाहण्यास मिळाला. या सामन्यात आणखी एक खास प्रसंग पाहण्यास मिळाला ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. दोन्ही संघात सामना तर एकच झाला मैदानात मात्र दहा संघांचे खेळाडू उतरले होते.
या सामन्यात दोन्ही देशांचे प्रत्येकी 11 खेळाडू होते. पण यात खास बाब अशी होती की दोन्ही संघांना वेगवेगळ्या देशांच्या दहा खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. अमेरिकेच्या संघातील 11 खेळाडूंपैकी पाच खेळाडूंनी दुसऱ्या देशात जन्म घेतला आहे पण ते आता अमेरिकेसाठी खेळत आहेत. या संघात अमेरिका आणि भारताच्या 3-3 खेळाडूंनी भाग घेतला होता. दोन खेळाडू साऊथ आफ्रिकेचे तर पाकिस्तान, कॅनडा आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका खेळाडूने सहभाग घेतला. म्हणजेच या संघाचे प्रतिनिधित्व सहा देशांच्या खेळाडूंनी केले.
T20 WC 2024: वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर; नामिबियाचा ओमानवर थरारक विजय
कॅनडाच्या स्क्वाड मध्येही काहीशी अशीच परिस्थिती राहिली. या संघात भारत पाकिस्तान व्यतिरिक्त चार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गयाना, बार्बाडोस, जमैका आणि कुवेतच्या प्रत्येकी 1-1 खेळाडूने संघाचे प्रतिनिधित्व केले. म्हणजेच या संघाचे प्रतिनिधित्व सहा दुसऱ्या देशांतील चार खेळाडूंनी केले. अशा प्रकारे दहा देशांच्या खेळाडूंनी टी 20 वर्ल्डकप मधील पाहिला सामना खेळला.
या सामन्यात अमेरिकेची सुरुवात खराब राहिली. स्टीव्हन टेलर खाते न उघडताच बाद झाला. यानंतर कर्णधार मोनांक पटेल सुद्धा फक्त 16 धावा करून बाद झाला. यानंतर अॅरोन जोन्स आणि अँड्रीज गॉस यांनी मोठी भागीदारी करत संघाच्या डावाला सावरले. या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. गॉसने 65 रन केले. कॅनडाच्या निखील दत्ताने त्याला बाद करत भागीदारी तोडली. दुसऱ्या बाजूला अॅरॉन खेळपट्टीवर होता. त्याने 40 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि दहा षटकारांचा समावेश आहे. या सामन्यातील फलंदाजीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यात कॅनडाचा एकही गोलंंदाज चालला नाही. त्याचा फटका कॅनडाला बसला. पहिल्याच सामन्यात नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. 194 चांगली धावसंख्या उभारलेली असतानाही या धावांचा बचाव गोलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच सामन्यात विजय मिळाल्याने यजमान अमेरिका संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.
T20 World Cup : विंडीजचा पहिला विजय! नवख्या पापुआ न्यू गिनी संघावर मात