Download App

रवींद्र जडेजाच्या जागी ऑल राऊंडर कोण? ‘या’ तिघांचं क्रिकेटमधलं रेकॉर्डही खणखणीत

रवींद्र जडेजाच्या टी 20 क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Ravindra Jadeja : भारतीय संघाने टी 20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघाने (Team India) अकरा वर्षांचा दुष्काळ संपवला. मात्र या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा या (Ravindra Jadeja) तीन दिग्गज खेळाडूंनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रवींद्र जडेजाच्या निवृत्तीच्या घोषणेने तर अनेकांना हैराण केले. कारण क्रिकेट चाहत्यांसाठी त्याची ही घोषणा अनपेक्षित होती. आता जडेजाच्या जागी कोणत्या ऑल राऊंडर खेळाडूला संघात एन्ट्री मिळते याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊ या की जडेजाच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळू शकते..

राहुल तेवतिया

या यादीत पहिल्या क्रमांकावर धडाकेबाज फलंदाज राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आहे. तेवतिया अजून भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. राहुलने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आपल्या प्रदर्शनाने अनेकांची मने जिंकली. 2020 मधील आयपीएल स्पर्धेत राजस्थान विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार मारून राहुल तेवतिया चर्चेत आला होता. त्याची विस्फोटक फलंदाजी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. फलंदाजी बरोबरच लेग स्पिन गोलंदाजीचेही कौशल्य असलेल्या या गुणी खेळाडूला अजून तरी टीम इंडियात (Team India) संधी मिळालेली नाही. आता रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागी राहुलचा विचार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ravindra Jadeja : माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं बंद करा; वडिलांच्या ‘त्या’ मुलाखतीवर भडकला जडेजा

कृणाल पांड्या

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज कृणाल पांड्या (Krunal Pandya) आहे. तो फलंदाजी बरोबरच चांगली गोलंदाजीही करू शकतो. नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याचाही अनुभव त्याच्याकडे आहे. सन 2018 मध्ये कृणालने भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मागील काळात त्याची गोलंदाजी प्रभावी राहिली आहे. आयपीएलच्या या हंगामात त्याने पाच विकेट घेतल्या. लोअर ऑर्डरमध्ये तो चांगली फलंदाजी सुद्धा करतो. अशात जडेजाच्या जागी त्याचा विचार होऊ शकतो.

वॉशिंग्टन सुंदर

यादीत तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याचं नाव आहे. त्याने सन 2017 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सुंदरने त्याचा अखेरचा टी 20 सामना 2020 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) खेळला होता. या सामन्यात सुंदरने आक्रमक गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या होत्या. गोलंदाजीबरोबरच सुंदर फलंदाजी सुद्धा चांगली करतो. ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळते त्यावेळी तो संघासाठी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. आता रवींद्र जडेजा निवृत्त झाल्यानंतर सुंदरच्या नावाचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते.

T20 World Cup 2024 : सूर्यकुमार यादव पुन्हा फ्लॉप! खराब कामगिरीने चाहते निराश

follow us