Download App

IND vs ZIM : टीम इंडियानंतर झिम्बाब्वेही सज्ज; संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूच्या हाती कमान

भारताविरुद्धच्या पाच टी 20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी काल झिम्बाब्वेच्या 17 सदस्यीय स्क्वाडची घोषणा करण्यात आली.

IND vs ZIM : टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचा (IND vs ZIM) पहिलाच सामना झिम्बाब्वे संघाविरुद्ध (Team India) होणार आहे. दोन्ही संघांदरम्यान  6 जुलैपासून पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी काल झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेतील पाचही सामने हरारे स्पोर्टस् क्लब येथे होणार आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा 24 जूनलाच करण्यात आली होती. त्यानंतर आता झिम्बाब्वेने आपल्या सतरा सदस्यीय स्क्वाडची घोषणा केली आहे. या सतरा खेळाडूंतून सामन्यावेळी अंतिम अकरा खेळाडूंची निवड होणार आहे.

या निर्णयाची माहिती झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर दिली. झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व सिकंदर रझा या अष्टपैलू खेळाडूकडे देण्यात आले आहे.  सिकंदर रझा हा आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत अनेक यशस्वी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. आता या मालिकेसाठी बोर्डाने पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती

झिम्बाब्वे संघ

झिम्बाब्वे संघात रझा सिकंदर (कर्णधार), अक्रम फराज, ब्रेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंदाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन यांचा समावेश आहे.

भारतीय संघ

भारतीय संघात शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे.

बुमराह-हार्दिकचा चिवट मारा, विराटची बॅट अन् सूर्याचा कॅच; भारताच्या विजयाचे टर्निंग पॉइंट

follow us

वेब स्टोरीज