Women Asia Cup : भारताचे स्वप्न भंगले; श्रीलंकेने पहिल्यांदा आशिया कप जिंकला !

भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या बदल्यात 165 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली.

Asia Cup Srilanka Won

Asia Cup Srilanka Won

IND vs Sri Lanka Women Asia Cup Final: आशिया कपच्या फायनलमध्ये (Women Asia Cup) श्रीलंकेने भारतीय संघाला आठ विकेटने पराभूत करत इतिहास रचला आहे. श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदाच आशिया कप जिंकला आहे. भारतीने (India) संघाने लंकेसमोर ( Srilanka) 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य लंकेच्या संघाने हे लक्ष्य 19 ओव्हरमध्ये दोन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले.

भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या बदल्यात 165 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तर ऋचा घोषणे 30 धावांची खेळी केली. प्रत्त्युरात श्रीलंकेचे सुरुवात खराब झाली.

Women’s Asia Cup : चक दे इंडिया! बांग्लादेशचा एकतर्फी पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री

पहिली विकेट लवकर गेल्यानंतर कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमाने सावध खेळत संघाला विजयापर्यंत नेण्याची मोलाची भूमिका बजाविली. कर्णधार अटापट्टूने 61 धावा काढल्या. तर समरविक्रमा ही 69 धावांवर नाबाद राहिली. भारताकडून दीप्ती शर्माला एकच विकेट घेता आली.

भारतीय संघ नवव्यांदा आशिया कपचा अंतिम सामना खेळत होता. भारताची आशिया कपची कामगिरी पाहता भारत हा सामना सहज जिंकून आठव्यांदा विजेतेपद पटकावेल, असे वाटत होते. लंकेच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत भारताचा विजयरथ रोखला आहे.

Olympics 2024 मधील यशामागे वडिलांचा मोठा त्याग; कसा आहे मनू भाकरचा प्रेरणादायी प्रवास?

Exit mobile version