Download App

ICC Rankings : आयसीसीची ताजी क्रमवारी जाहीर, स्टार फलंदाज संजू सॅमसनची मोठी झेप

ICC Rankings : नुकतंच आयसीसीने नवीन रँकिंग (ICC Rankings) अपडेट केली आहे. नवीन रँकिंगमध्ये काही भारतीय खेळाडूंना धक्का बसला आहे तर

  • Written By: Last Updated:

ICC Rankings : नुकतंच आयसीसीने नवीन रँकिंग (ICC Rankings) अपडेट केली आहे. नवीन रँकिंगमध्ये काही भारतीय खेळाडूंना धक्का बसला आहे तर काही खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यातील 4 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे, तर श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL VS NZ) यांच्यातील दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजचा (ENG VS WI) पराभव केला आहे. यानंतर आयसीसीने नवीन  रँकिंग अपडेट केली आहे.

नवीन रँकिंगमध्ये टी-20 फलंदाजी क्रमवारीत ट्रेव्हिस हेड (Travis Head) पहिल्या स्थानावर कायम आहे. तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) तिसऱ्या स्थानावर आहे. तर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या तर  जोस बटलर सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन 10व्या स्थानावर पोहोचला आहे.

तर दक्षिण आफ्रिके विरुद्ध शानदार शतकीय खेळी खेळणारा भारतीय फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) 27 स्थानांच्या वाढीसह 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर टिळक वर्मा 24 स्थानांच्या वाढीसह 72 व्या स्थानावर आहे. टी-20 गोलंदाजी क्रमवारी इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या स्थानावर कायम असून  श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर रवी बिश्नोई सातव्या स्थानावर आणि अर्शदीप सिंग 12 व्या स्थानावर आहे. या क्रमवारीमध्ये  वरुण चक्रवर्तीला मोठा फायदा झाला असून तो आता 110 स्थानांच्या वाढीसह 64 व्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा मिचेल सँटनर चार स्थानांच्या वाढीसह 13व्या तर लॉकी फर्ग्युसन 10 स्थानांच्या वाढीसह 15व्या स्थानावर आहे.

“शरद पवारांनीच शिवसेना फोडली, आम्हाला मुख्यमंत्रीही केलं नाही”, छगन भुजबळांचं रोखठोक उत्तर

इंग्लंडची जोफ्रा आर्चर 21 व्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा मातिशा पाथिराना 31 व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत लियाम लिव्हिंगस्टोन अव्वल स्थानावर आहे, तर भारताचा हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानावर आहे.

follow us