अॅशेस मालिकेतील 2023 चा पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. अॅशेसमध्ये 150 विकेट घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. यामध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. इंग्लंडने पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 283 धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियन संघ पहिला डाव खेळत आहे. वृत्त लिहेपर्यंत संघाने 4 गडी गमावून 137 धावा केल्या होत्या. (Stuart Broad Completed 150 Wickets In Ashes Series 2023 England Vs Australia)
स्टुअर्ट ब्रॉड अॅशेस मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. हा अहवाल येईपर्यंत त्याने 73 डावात 151 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान ब्रॉडची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 8 विकेट्स घेणे. यामध्ये 150 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अॅशेसमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शेन वॉर्नच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू वॉर्नने 72 डावात 195 विकेट घेतल्या होत्या. या बाबतीत मॅकग्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 60 डावात 157 विकेट घेतल्या.
ब्रॉडच्या ओव्हर ऑल रेकॉर्डवर नजर टाकली तर तोही उत्कृष्ट ठरला आहे. त्याने 307 कसोटी डावात 600 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 15 धावा देऊन 8 बळी घेणे ही या ब्रॉडची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3 वेळा दहा विकेट्स घेतल्या आहेत. तर 20 वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये 178 विकेट घेतल्या आहेत. ब्रॉडने या फॉरमॅटमध्ये 121 सामने खेळले आहेत.
गदर 2 चं महाभारताशी आहे खास कनेक्शन; दिग्दर्शकांनी केला खुलासा…
अॅशेस 2023 च्या पाचव्या कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडने 283 धावा केल्या होत्या. यादरम्यान हॅरी ब्रूकने 85 धावांची शानदार खेळी केली. मोईन अलीने 34 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने 137 धावा केल्या होत्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा 157 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. डेव्हिड वॉर्नर 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्नस लबुशेन 9 धावा करून बाद झाला.