Rohit Sharma : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाची (Team India) गाडी रुळावरून घसरली. दुसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात दारुण पराभवाला सामोरं जावे लागलं. या पराभवासाठी कर्णधार रोहित शर्माची फलंदाजी आणि नेतृत्व याला जबाबदार धरलं जातंय. त्यामुळं रोहित शर्माला (Rohit Sharma) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येणार असे वृत्त आहे.
AUS vs IND : कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियामधून बाहेर? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी उद्या 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
रोहित शर्मा प्रॅक्टीसला गैरहजर…
सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाने फिल्डिंग प्रॅक्टीस केली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सरावात रोहित शर्मा कुठेच दिसला नाही. खरंतर, रोहित शर्मा नियमितपणे अशा सरावांमध्ये भाग घेतो. मात्र सिडनी कसोटीपूर्वी त्याच्या जागी गिलने सराव केला. त्यामुळं सिडनी कसोटीत रोहित शर्माला डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. परिणामी, भारतीय संघाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल, अशी माहिती आहे.
Rohit Sharma not part of the potentially new-look slip cordon. With Kohli at first, KL at second and Reddy at third. While Shubman Gill was taking catches at slip for a spinner. The massive intrigue of Indian cricket #AusvInd pic.twitter.com/aynUip01Om
— Bharat Sundaresan (@beastieboy07) January 2, 2025
दरम्यान, सिडनी कसोटीपूर्वी झालेली पत्रकार परिषद टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा ऐवजी गौतम गंभीरने घेतली. सहसा संघाचा कर्णधार कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी माध्यमांशी बोलतो. जेव्हा रोहित ऐवजी मुख्य प्रशिक्षक गंभीर पत्रकार परिषद घेण्यासाठी आला तेव्हा त्याला सिडनी कसोटीत रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने या प्रश्नाला बगल देत सांगितलं की, हा निर्णय नाणेफेकीनंतर होईल.
गंभीर म्हणाला, ‘रोहित सोबत सगळं काही ठीक आहे, मला वाटत नाही की, पत्रकार परिषदेत त्याच्या अनुपस्थितीबद्दल कोणतीही चर्चा व्हायला हवी. हेड कोच इथे आहे आणि ते पुरेसं आहे. उद्या विकेट पाहून आम्ही प्लेइंग 11 निवडू, असं तो म्हणाला.
भारत काही करून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वाचवणार असल्याचंही गंभार म्हणाला. भारताला ही ट्रॉफी वाचवायची असल्यास आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धत्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असल्याचस कोणत्याही परिस्थिती सिडनी कसोटीत विजय मिळवणं आवश्यक आहे, असं तो म्हणाला.
सिडनी कसोटी कधी आणि कुठे खेळली जाईल?
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी येथे खेळला जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर प्रेक्षक टीव्हीवर कसोटी सामना पाहू शकतात. तसेच, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टारवर केले जाईल. भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता सामना सुरू होईल.