India Vs Australia 4th T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील रायपूर येथे झालेला चौथा सामना भारताने (India ) जिंकला आहे. याचबरोबर या मालिकेत भारताने 3-1 ने आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसरी टी-20 मालिका जिंकली आहे.
‘पैसे दे नाहीतर जुनी केस पुन्हा उघडतो’; लाच मागणं ED अधिकाऱ्याच्या अंगलट…
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने चार षटकांत एक बाद 42 धावा केल्या. भारताला रवी बिश्नोई याने पहिले यश मिळवून दिले. त्याने जोश फिलिपला तंबूत परतविले. तर अक्षर पटेलने ट्रॅविड हेडला बाद केले. हेड 16 चेंडूत 30 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला 44 धावसंख्येवर दुसरा झटका बसला. त्यानंतरही अक्षर पटेलने आपल्या दुसऱ्याच षटकात ऑरेन हार्डी याला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर अक्षरने बेनला बाद करून चौथे यश मिळवून दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला. ऑस्ट्रेलियाचे अव्वल चार फलंदाज 89 धावांत तंबूत परतले. त्यामुळे भारताने या सामन्यात आपली पकड मजबूत केली. टीम डेव्हिड बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ सात बाद 154 धावा करू शकल्या. हा सामना भारताने वीस धावांनी जिंकला आहे. अक्षर पटेलने तीन, तर दीपक चहरने दोन बळी घेतले आहेत.
Mizoram Election : मिझोराम निवडणुकीच्या निकालाची तारीख पुढं ढकलली, आता ‘या’ दिवशी मतमोजणी
रिंकू सिंगचा पुन्हा धमाका !
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने 9 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या आहेत. टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाडने जोरदार सुरुवात केली. पहिल्या तीन षटक यशस्वी खेळला. पहिल्या सहा षटकांत एक बाद 50 धावा केल्या आहेत. यशस्वीने 28 चेंडूत 37 धावांची खेळी. तर श्रेयस अय्यर या सामन्यात अपयशी ठरला. तो अवघ्या आठ धावांवर बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवही एक धाव करून तंबूत परतला. तर ऋतुराज 28 चेंडूत 32 धावा करून तंबूत परतला आहे. त्यानंतर जितेश शर्मा आणि रिंकू सिंगने डाव सांभाळला. रिंकूने पुन्हा एकदा आपला स्फोटक खेळ दाखविला. त्याने 29 चेंडूत 46 धावांची खेळी. तर विकेटकीपर जितेश शर्मानेही 19 चेंडूत 35 धावा केल्या. जितेश शर्मा बाद झाल्यानंतर भारताचे गडी झटपट बाद झाले. अक्षर पटेल आणि दीपक चहर हे शून्यावर बाद झाले. त्यामुळे नऊ बाद 174 धावांपर्यंत भारताने मजल मारली होती.