T20 League : टी 20 क्रिकेट स्पर्धांसाठी आज दुबईत खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली. लिलावात पहिलाच (T20 League) खेळाडू राजस्थान संघाने मोठी बोली लावून खरेदी केला. रोव्हमन पॉवेलने त्याच्यासाठी एक कोटींची बेस प्राइस निश्चित केली होती. मात्र राजस्थानने त्याच्यासाठी 7.40 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात घेतले. लिलाव सुरू झाल्यानंतर विकला जाणारा पॉवेल हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडलाही (Travis Head) हैदराबाद संघाने 6 कोटी 8 लाख रुपयांत खरेदी केले. तर दुसरीकडे मागील हंगामात हैदराबाद संघात असणाऱ्या हॅरी ब्रुक (Harry Brook) याला दिल्ली संघाने 4 कोटी रुपयांत खरेदी केले.
स्टीव्ह स्मिथ, मनीष पांडे अनसोल्ड
या लिलावात धडाकेबाज कामगिरी करणारा मनीष पांडे, करुण नायर आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिले. म्हणजेच त्यांना एकाही संघाने विकत घेतले नाही. या फलंदाजांचे आता टी 20 लिगमधील करिअरही संपुष्टात आल्याचे दिसत आहे. स्टीव्ह स्मिथने याआधी याच क्रिकेट स्पर्धांत पुणे आणि राजस्थान संघाचं नेतृत्व केलं होतं. पण आता याच स्टीव्हला आपल्या संघात घेण्यास एकाही संघाची तयारी दिसत नाही. तसेच राइली रुसो यालादेखील एकाही संघाने खरेदी केले नाही.
World Cup Final : रोहितच्या ‘त्या’ दोन चुका पडल्या महागात; टीम इंडियाचं गणित हुकलंच
हैदराबादच्या ताफ्यात ‘हेड’, 6 कोटी 8 लाखांत केले खरेदी
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (World Cup 2023) दमदार कामगिरी करून भारताच्या हातातून सामना हिसकावणारा ट्रॅव्हिस हेडला हैदराबादने संघात घेतले आहे. हेडने त्याची बेस प्राइस दोन कोटी रुपये ठेवली होती. त्याच्यासाठी चेन्नई आणि हैदराबाद संघात जोरदार स्पर्धा सुरू होती. अखेर हैदराबादने 6 कोटी 8 लाख रुपयांची बोली लावत हेडला खरेदी केले.
हॅरी ब्रुकला मिळाले चार कोटी
मागील वर्षात हैदराबादच्या संघात असलेल्या हॅरी ब्रुकने यावेळच्या लिलावासाठी त्याची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली होती. त्याला खरेदी करण्यासाठी राजस्थान आणि दिल्ली या दोघांनी बोली लावली. दिल्लीने बाजी मारत ब्रुकला 4 कोटींना खरेदी केली.
World Cup Final Pitch : खराब खेळपट्टीमुळं वर्ल्डकप गमावला? ICC ने केला मोठा खुलासा