IPL Auction : वडिलांकडून मारण्याचा प्रयत्न पण आईने दिले जीवनदान, राजस्थानने खरेदी केलेल्या पॉवेलचा खडतर प्रवास

IPL Auction : वडिलांकडून मारण्याचा प्रयत्न पण आईने दिले जीवनदान, राजस्थानने खरेदी केलेल्या पॉवेलचा खडतर प्रवास

IPL Auction : आयपीएल क्रिकेट स्पर्धांसाठी आज दुबईत खेळाडूंच्या लिलावाला (IPL Auction ) सुरुवात झाली. लिलावात पहिलाच खेळाडू राजस्थान संघाने मोठी बोली लावून खरेदी केला. रोव्हमन पॉवेलने त्याच्यासाठी एक कोटींची बेस प्राइस निश्चित केली होती. मात्र राजस्थानने त्याच्यासाठ 7.40 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात घेतले.

मात्र याच पॉवेलचं जीवन कहाणी अत्यंत खडतर अशी आहे. गरिबीतून तो वर आलेला असून त्याचा वेस्टइंडीजचा टीमचा कॅप्टन होण्यापर्यंतचा प्रवास सोप नव्हता. त्याचा जन्म जमैकामध्ये झाला. कशी आहे त्याची संघर्ष कहाणी जाणून घेऊ… ( West Indies Caption Rovman Powell Story how he faces situation in his life )

Delhi Ordinance Bill: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांचा सभात्याग, आपचा खासदार निलंबित

रोव्हमन पॉवेलला त्याच्या आई आणि बहिणीने सांभाळले आहे. जेव्हा रोव्हमन त्याच्या आईच्या पोटात होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या आईला रोव्हमनला जन्म द्यायचा होता. त्यांनी त्या मुलाला जन्म दिला आणि आज त्याचं मुलाने म्हणजे रोवमॅन पॉवेलने त्यांच्या कुटुंबाचच नाही तर देशाचं नाव उंचावर नेलं आहे.

भारतीय नारी सब पे भारी! पुणे मेट्रो ट्रेनचे ‘सारथ्य’ सात तरुणींच्या हाती…

तर रोव्हमन जमैकाच्या बेनिस्टेर डिस्ट्रिक्ट ऑफ ओल्ड हार्बरमध्ये जन्म एवढ्या खडतर परिस्थितीत झाल्यानंतर रोव्हमन आणि त्याच्या बहिणीच्या शिक्षणासाठी रोव्हमनच्या आईने लोकांच्या घरी धुनी-भांडी केली. ती सिंगल मदर होती. दोन्ही मुल ती एकटी सांभाळत होती. मात्र रोव्हमनने त्याच्या आईला वचन दिलं होतं की, तो तिला गरिबीतून बाहेर काढेल. तेच वचन पुर्ण करण्यासाठी तो एवढा मोठा पल्ला गाठत आहे. 2019 मध्ये त्याने त्याच्या आईला कार गिफ्ट केली आहे. ही माहिती वेस्टइंडिजचा दिग्गज खेळाडू इयान बिशप याने सांगितली आहे.

तर एका मुलाखातीत रोव्हमनच्या आईने सांगितले होते की,रोव्हमन अत्यंत नटखट आहे. मात्र तो तितकाच समजदार आहे. तर त्याने देखील एकदा सांगितले होते की, जेव्हा जेव्हा तो संकटांचा सामना करतो तेव्हा तो हे आपण आपल्या आई आणि बहिणीसाठी करत आहे. तो त्याच्या आईलाच वडिल मानतो. जिने त्याच्या आयुष्यात दोन्ही भूमिका पार पाडल्या आहेत. तर रोव्हमनच्या पत्नीचं नाव प्रिया अ‍ॅलेक्झांडर आहे. ते एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. 2 मार्च 2019 ला त्यांनी विवाह केला. तो सोशल मिडीयावर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असतो. नेहमी फोटो शेअर करत असतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube