Download App

IND vs AUS : दुसऱ्या सामन्यातही युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाला लोळवले !

  • Written By: Last Updated:

T20 Series : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने (India) ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव केलाय. याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत (T20 Series) भारतीय संघाने 2-0 ने आघाडी घेतलीय. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांबरोबर गोलंदाजांनी शानदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलिया संघ 9 बाद 191 धावा करू शकल्याने हा सामना भारताने 44 धावांनी जिंकला आहे.

दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ऋषिकेश बेदरेला मी ओळखत नाही; व्हायरल फोटोवर राजेशे टोपेंचा खुलासा

वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे अव्वल फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. स्टिव्ह स्मिथ 19, मॅथ्यू शॉर्ट 19 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलही बाराच धावा करू शकला. मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. टीम डेव्हिड 37 आणि मॅथ्यू वेड 42 धावांवर नाबाद राहिला. प्रसिध्द कृष्णा आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

शरद पवारांचे पुन्हा पावसात भाषण ! धैर्याने पुढे जायचा सल्लाही
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेडचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरविला. इशान किशन, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या त्रिकुटाने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

जैस्वालकडून चौकारांचा पाऊस
सलामीवीर जैस्वाल आणि गायकवाड जोरदार सुरुवात करून दिली. जैस्वालने चौकार, षटकारांचा पाऊस पाडत 25 चेंडूत 53 धावांची स्फोटक खेळी केली. त्यात त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तर इशान किशनने 32 चेंडूत 52 धावा कुटल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने 19 धावा केल्या. तर रिंकू सिंगने शेवटची क्षणी स्फोटक खेळी केली. त्याने नऊ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारत 31 धावांची शानदार खेळी केली. वीस षटकांत भारताने चार गड्यांच्या बदल्यात 235 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन इलिसने तीन बळी घेतले आहे.

Tags

follow us