दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ऋषिकेश बेदरेला मी ओळखत नाही; व्हायरल फोटोवर राजेशे टोपेंचा खुलासा

  • Written By: Published:
दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ऋषिकेश बेदरेला मी ओळखत नाही; व्हायरल फोटोवर राजेशे टोपेंचा खुलासा

Rajesh Tope : अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या उपोषणादरम्यान दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याच्यासह दोघांना अटक करण्यात आली होती. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ऋषिकेश बेदरे (Rishikesh Bedre) आणि शरद पवार (Sharad pawar) यांचा फोटो ट्विट केला आहे. बेदरे यांनी पवार आणि राजेश टोपे यांची भेट घेतल्याचे राणे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी खुलासा केला. ऋषिकेश बेदरेला मी ओळखत नसल्याचं ते म्हणाले.

ना बारामती, ना माढा! संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य 

एक व्हिडिओ जारी करत राजेश टोपी यांनी व्हायरल झालेल्या फोटोविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, दगडफेकी प्रकरणी अटक केलेल्या ऋषिकेश बेदरेचा माझ्याशी आणि शरद पवारांशी संबंध जोडल्या जात आहे. मात्र, अंतरवली सराटी प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषिकेश बेदरे हा व्यक्ती माझ्या भागातील नाही. यापूर्वी मी त्याला कधी पाहिलं नाही. मी त्याला ओळखतही नाही, असं ते म्हणाले.

हार्दिक गुजरातकडून अन् रोहित मुंबईकडूनच खेळणार! पहा रिलीज अन् रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी 

पुढं बोलताना टोपे म्हणाले की, लाठीचार्ज झाल्यानंतर पवार साहेब अंतरवली येथे आले होते. त्यांनी जखमी आंदोलकांची भेट घेतली. त्या प्रसंगी ऋषीकेश बेदरे या व्यक्तीने जमावाता घूसून तो फोटो काढला असावा. यापलीकडे त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही आणि नव्हता. या संदर्भात पोलीस प्रशासनाने त्याची पाळेमुळं व सत्यता पडताळावी आणि जे काही खरे आहे ते बाहेर काढावं, ही विनंती.

काय म्हणाले नितेश राणे?

अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषिकेश बेदरेने शरद पवार, राजेश टोपे यांची भेट घेतली. १ सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक आणि ३ सप्टेंबरला शरद पवारासोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कोणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय, असा सवाल राणेंनी विचारला.

यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो नितीश राणेंचा असून, त्यात राष्ट्रवादीचा दावा आहे की, त्यांच्या शेजारी उभी असलेली व्यक्ती हृषिकेश बेदरे हा आहे. हा फोटो पोस्ट करत लवांडे म्हणाले की, विचारशुन्य युवा नेते नितेश राणे तुमच्यासोबत तुमचा मित्र कोण? हे गृहखात्याला सांगावं. फडणवीस या जोडीला तुम्ही ओळखता का?, असं म्हणत राणेंना घेरण्याचा प्रयत्न केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube