Download App

भारताचा ‘सूर्य’ चमकला, अफगाणिस्तान विरुद्ध ठोकले शानदार अर्धशतक; भारताने उभारली सर्वोच्च धावसंख्या

T20 WC AFG vs IND : T20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर 8 चा तिसऱ्या सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान (AFG vs IND) यांच्यात

  • Written By: Last Updated:

T20 WC AFG vs IND : T20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर 8 चा तिसऱ्या सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान (AFG vs IND) यांच्यात बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळाला जात आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) शानदार खेळी करत अर्धशतक ठोकले आहे. भारताने या सामन्यात अफगाणिस्तान समोर 182 धावांचा लक्ष्य दिला आहे.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 181 धावा केल्या. T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताने प्रथमच 150 पेक्षा जास्त धावसंख्या केली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये भारताने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरलेली आहे. मात्र प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली.

भारताला फजलहक फारुकीने पहिला झटका दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला बाद केले. रोहितने 13 चेंडूत 8 धावा केल्या त्यानंतर भारतीय संघाला दुसरा झटका 7व्या षटकात लागला. ऋषभ पंतने 11 चेंडूत 20 धावा केल्या तर पुन्हा एका विराट कोहली या स्पर्धेत मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने या सामन्यात 24 चेंडूत 24 धावा केल्या तर शिवम दुबे 7 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याने 5व्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. सूर्याने 28 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली. सूर्याने या स्पर्धेत आपला दुसरा अर्धशतक पूर्ण केला आहे.

तर हार्दिक पंड्याने 24 चेंडूत 36 धावा केल्या आणि रवींद्र जडेजाने 5 चेंडूत 7 धावा तर अक्षर पटेलने 6 चेंडूत 12 धावा केल्या आणि अर्शदीप सिंग 2 धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून रशीद खान आणि फजलहक फारुकी यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले तर नवीन उल हकला 1 विकेट मिळाला.

दोन्ही संघाची प्‍लेइंग 11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

धक्कादायक! UGC NET 2024 परीक्षेचा पेपर फक्त 5 हजारातच फुटला

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

follow us

वेब स्टोरीज