Download App

अमेरिकेची झुंज अपयशी, सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी

टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेने अमेरिका संघाचा पराभव केला.

T20 World Cup 2024 USA vs RSA : टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच (T20 World Cup) सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेने अमेरिका संघाचा पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 195 धावा केल्या होत्या. यानंतर अमेरिकेच्या फलंदाजांनी चिवट प्रतिकार केला मात्र त्यांना विजयासाठी 18 धावा कमी पडल्या. 20 ओव्हर्सध्ये यूएसएचे फलंदाज 176 धावाच करू शकले. या पराभवानंतर या फेरीतील अमेरिकेची पुढील वाटचाल आता आणखी कठीण झाली आहे.

साखळी फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या संघाने चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे सुपर 8 मध्ये आफ्रिकेसमोर दडपण होते. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डिकॉकने दमदार खेळी करत 40 चेंडूत 74 धावा केल्या. मार्करामने 46 तर क्लासेनने 36 धावा केल्या. या फलंदाजांच्या जोरावर आफ्रिकेने 20 ओव्हर्समध्ये 195 धावा केल्या. सौरभ नेत्रावळकरने प्रभावी मारा करत 21 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

T20 world cup 2024 : अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका; आजपासून रंगणार ‘सुपर-8’चा थरार

अमेरिकेसमोर आव्हान मोठे होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात केली. पहिल्या पाच ओव्हर्समध्येच 1 बाद 52 धावा झाल्या होत्या. त्यामुळे आफ्रिकेचे गोलंदाज दडपणात आले होते. अँड्रियेस गाऊस आणि हरमित सिंग या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. अँड्रियेसने 80 तर हरनमीतने 38 धावा केल्या. यानंतर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ही जोडी फोडली. त्याच्या गोलंदाजीवर हरमीत बाद झाला. तेथून पुढे अमेरिकेच्या विजयाच्या शक्यताही मावळल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये तर 27 धावांची गरज होती. मात्र या ओव्हरमध्ये फक्त सात धावा करता आल्या.

दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये कात टाकली आहे. कागिसो रबाडा, ओटनिल बार्टमॅन, मार्को यान्सेन व केशव महाराज यांनी ठसा उमटवला आहे. ॲनरिक नॉर्किया याच्याकडून आयपीएलमध्ये सुमार कामगिरी झाली, पण या स्पर्धेत त्याने झोकात पुनरागमन केलं. त्याने नऊ फलंदाज बाद केलं असून बार्टमन, महाराज यांनी प्रत्येकी पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.

वेस्टइंडिजमध्ये सुपर 8 चा थरार

अमेरिकन संघाने साखळी फेरीच्या चारही लढती स्वत:च्या घरामध्ये अर्थातच अमेरिकेमध्ये खेळल्या आहेत. तेथील वातावरण व खेळपट्टी यांच्याशी योग्य सांगड घालत त्यांनी पुढल्या फेरीत वाटचाल केली. आता ‘सुपर-आठ’ फेरीमधील सर्व लढती त्यांना वेस्ट इंडीजमध्ये खेळावयाच्या आहेत. तेथील खेळपट्ट्यांवर ते प्रथमच खेळले आहेत. यामुळे त्यांच्यासाठीही हे नवे आव्हान होते. या संघात आठ भारतीय वंशाचे, दोन पाकिस्तानी वंशाचे खेळाडू असून एक न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्‌स येथील खेळाडू आहेत. या पहिल्याच सामन्यात अमेरिकेच्या संघाला पराभव पत्करावा लागला.

follow us

वेब स्टोरीज