जिंकता जिंकता हरला नेपाळ! फक्त एक रन कमी पडला अन् सामना आफ्रिकेने हिरावला

जिंकता जिंकता हरला नेपाळ! फक्त एक रन कमी पडला अन् सामना आफ्रिकेने हिरावला

T20 World Cup SA vs Nepal : यंदाच्या टी 20 विश्वचषकात अनेक उलटफेर झाले आहेत. अगदी नवखे संघही अनुभवी आणि बलाढ्य संघांना भारी पडत आहेत. या संघातील खेळाडूंची कामगिरी चांगली होत असल्याने सामना जिंकण्यासाठी बलाढ्य संघांची चांगलीच दमछाक होत आहे. असाच एक थरारक सामना विश्वचषकात पाहण्यास मिळाला. सुपर 8 मध्ये प्रवेश केलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला नेपाळ विरुद्ध विजय मिळण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. विश्वचषकातील 34 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात खेळवला गेला. हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली. परंतु, त्यांचा हा विजय नेपाळ संघातील खेळाडूंच्या कामगिरीने झाकोळला गेला.

पावसाने केला खेळ! अमेरिकेची सुपर 8 मध्ये धडक; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

अखेरच्या चेंडूवर नेपाळला जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची गरज होती. यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांनी एक विकेट घेत एका धावेने सामना जिंकला. नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने 20 ओव्हर्समध्ये 115 धावा केल्या. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीवीर रेजा हेन्ड्रिक्स 43 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.

ट्रिस्ट स्टब्सने नाबाद 27 धावा केल्या. अशा प्रकारे एकूण 20 ओव्हर्समध्ये आफ्रिकेने 115 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाद करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेपाळच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. नेपाळच्या संघात अनुभवी खेळाडू नाहीत त्याचा फटका या सामन्यात बसला. सामन्याचे दडपण फलंदाज झेलू शकले नाहीत आणि थोड्या थोड्या अंतराने विकेट्स पडत गेल्या.

अखेरच्या ओव्हरमध्ये नेपाळला सामना जिंकण्यासाठी एका चेंडूत दोन धावांची गरज होती. या चेंडूवर फलंदाजाला काही करता आले नाही. तरीही रन घेण्यासाठी धावणाऱ्या फलंदाजाला धावबाद करण्यात विकेटकीपर क्विंटन डिकॉकने मदत केली. यामुळे सामना टाय झाला नाही आणि सुपर ओव्हरही टळली. आफ्रिकेने हा सामना जिंकला. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

कुशल भर्तेलने चार ओव्हर्समध्ये फक्त 19 धावा देत चार विकेट्स घेतल्या. तर दिपेंद्र सिंह ऐरीने तीन विकेट घेतल्या. फलंदाजीत नेपाळचा सलामीवीर आसिफ शेखने 42 धावांची खेळी केली. तो बाद होताच नेपाळचा डाव गडगडला. यानंतर अनिल साहने 27 धावा करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करत विजय साकारला.

बाबर आजमसह पूर्ण टीम तुरूंगात जाणार?; भारताने हरवल्यानंतर पाकिस्तानात दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube