New Zealand vs South Africa : 12 वर्षांच्या इतिहासाची पुनरावृत्ती; काय घडलं होतं?

टी20 विश्वचषक स्पर्धेत कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर आज सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडशी भिडणार आहे.

Untitle (8)

Untitle (8)

New Zealand vs South Africa : टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि न्यूझीलंडमध्ये (New Zealand) सेमीफायनल सामना कोलकताच्या ईडन गार्डनमध्ये रंगणार आहे. फायनल सामन्यात पोहोचण्यासाठी दोन्ही संघासाठी ही सुवर्णसंधी असून दक्षिण आफ्रिका संघ सलग दुसऱ्यांदा फायनल सामन्यात पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत असून संघासमोर मोठं आव्हान असणार आहे.

आत्तापर्यंतच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाची शानदार कामगिरी दिसून आली असून 2024 च्या स्पर्धेतही दक्षिण आफ्रिका संघ फायनलपर्यंत पोहोचली होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता याच पराभवाचा बदला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाकडून शानदार खेळी करण्यात यते आहे. टी20 च्या इतिहासात पाकिस्तान आणि श्रीलंका या दोनच संघांनी पोहोचलेले आहेत.

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला, 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान

पाकिस्तान संघ 2007 आणि 2009 च्या अंतिम सामन्यात दाखल झाला, तर श्रीलंका संघ 2012 आणि 2014 साली दाखल झाला होता. दोन्ही संघांनी दुसऱ्या फायनलमध्ये विजयी मिळवला होता. 2014 नंतर कोणताच संघ सलग फायनल खेळला नाही. जर दक्षिण आफ्रिकाने सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन फायनल सामन्यात पोहोचली तर 12 वर्षांचा इतिहास मोडणारा संघ ठरेल. न्यूझीलंड संघदेखील मजबूत असून आत्तापर्यंत स्पर्धेत संघाची चांगली कामगिरी राहिलेली आहे. 2021 मध्ये न्यूझीलंड फायनल सामन्यात पोहोचला होता, परंतू ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा पराभव झाला. आता पुन्हा एकदा न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका संघाचं आव्हान पेलणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड टी20 विश्वचषक 2026 उपांत्य सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होईल, दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी, संध्याकाळी 6:30 वाजता टॉससाठी मैदानात उतरतील. तुम्ही हा सामना टीव्हीवर थेट पाहू शकता, स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये.

न्यूझीलंड संघ:

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, जेकब डफी, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, कोल मॅककॉन्ची, जेम्स नीशम.

दक्षिण आफ्रिका :
एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रुइस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जॉर्ज लिंडे, क्वेना एमफाका, अँरिक नॉर्टजे, जेसन स्मिथ.

Exit mobile version