ENG vs Oman : टी 20 विश्वचषकात इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाच्या (ENG vs Oman) सामन्यात इंग्लंडने ओमानवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे गरजेचे (T20 World Cup) होते. पहिल्या दोन सामन्यांत इंग्लंडचा पराभव झाला होता. त्यामुळे हा सामना महत्वाचाच होता. या सामन्यात मात्र इंग्लंडने वर्चस्व गाजवत ओमानचा मोठा पराभव केला. विशेष म्हणजे, या सामन्यात इंग्लंडने ओमानला फक्त 47 धावांतच गुंडाळले आणि अवघ्या 19 चेंडूतच सामना खिशात टाकला.
इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ओमान विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे गरजेचे होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी घेतली. इंग्लंडच्या मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या गोलंदाजांनी सुरुवातीलाच ओमानच्या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडलं. पॉवर प्लेमध्येच ओमान संघाच्या 25 धावांत चार विकेट्स पडल्या होत्या. यानंतर अख्खा संघ फक्त 47 धावा करू शकला.
विंडीजचा सुपर विजय! पराभवामुळे न्यूझीलंडचं सुपर 8 चं गणित बिघडलं
या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. पहिल्याच दोन चेंडूवर फिल सॉल्टने दोन षटकार खेचले. यानंतर मात्र संघाला पहिला धक्का बसला. यानंतर विल जॅकह 5 धावा करून माघारी परतला. कर्णधार जोस बटलरने आक्रमक फलंदाजी करत 24 धावा केल्या आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला.
दरम्यान, याआधीच्या सामन्यात इंग्लंडचा नेट रनरेट चांगला नव्हता. परंतु, ओमानवर मोठा विजय मिळाल्याने रनरेटमध्ये सुधारणा झाली आहे. सध्या इंग्लंडची टीम स्कॉटलंडपेक्षा दोन गुणांनी मागे आहे. रनरेट मात्र जास्त आहे. स्कॉटलंडचा रनरेट +2.164 तर इंग्लंडचा रनरेट +3.081 आहे. आता सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर इंग्लंडला नामिबियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी; ‘या’ तीन खेळाडूंवर पाकिस्तान बोर्ड करणार कारवाई?
यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धेत अनेक उलटफेर होताना दिसत आहेत. आताही असाच एक उलटफेर झाला आहे. अटीतटीच्या सामन्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला. या विजयानंतर विंडीज संघाने सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पराभवामुळे न्यूझीलंडचं सुपर 8 फेरीतील प्रवेशाचं गणित डळमळीत झालं आहे. न्यूझीलंडचे आणखी दोन सामने बाकी आहेत मात्र तरीही संघाचा सुपर 8 मधील प्रवेश कठीण झाला आहे. या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.