Ind Vs Aus 2024 : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने (Ind Vs Aus 2024) शानदार कामगिरी करत आपली पकड मजबूत केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात भारतीय संघ 44.1 षटकात 180 धावा करून गडगडला.
मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालला बाद केला. भारताकडून नितीश रेड्डीने 54 चेंडूत 42 धावा केल्या. तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून 85 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आता भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून फक्त 94 धावांनी पिछाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 13 धावा केल्या तर नॅथन मॅकस्विनी 38 आणि मार्नस लॅबुशेन 20 धावांवर खेळत होते.
या डे- नाईट कसोटी (Day- Night Test) सामन्यात भारतीय संघाची सूरूवात खूपच खराब झाली. मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर यशस्वी जैस्वालला बाद केला त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने भागीदारी करत भारताची धावसंख्या 69 धावांपर्यंत नेली. मात्र त्यानंतर 37 धावा करून केएल राहुल आऊट झाला. त्यानंतर काहीच वेळात भारतीय संघाने शुभमन गिल आणि विराट कोहलीची विकेटही गमावली. गिल 31 तर विराटला 7 धावा करता आल्या.
चहानंतर रोहित शर्मा, ऋषभ पंत बाद झाले. त्यानंतर नितीश रेड्डीने शानदार खेळी करत भारतीय संघाला 180 धावांपर्यंत नेले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 48 धावांत 6 विकेट घेतल्या तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने 2-2 विकेट घेतल्या. स्टार्कने डे- नाईट कसोटी सामन्यात तिसऱ्यांदा 5 हून अधिक विकेट घेतले तर कसोटीत 15व्यांदा एका डावात 5 पेक्षा जास्त विकेट मिचेल स्टार्कने घेतले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम विरोधात आंदोलन, नगर शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु
या सामन्यात भारतीय संघ तीन बदलांसह उतरला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रविचंद्रन अश्विन, देवदत्त पडिक्कलच्या जागी शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलच्या जागी रोहित शर्मा संघात परतला आहे. तर बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.