Team India For T20 series Against England : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (Team India) जाहीर झाला आहे. गेल्या सव्वा वर्षापासून संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammad Shami) संघात पुनरागमन झाले आहे. विकेटकीपर व फलंदाज ऋषभ पंतला संघात संधी मिळाली नाही. तर अक्षर पटेलवर (Axar Patel) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही ; शरद पवार
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. एका शस्त्रक्रियानंतर तो घरगुती क्रिकेटमध्ये खेळला होता. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक, विजय हजारे ट्रॉफीमध्ये देण्याची चांगली कामगिरी केली होती. इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी ऋषभ पंतला संघात जागा मिळू शकले नाही. त्याएेवजी दोन विकेटकीपर संघाला स्थान देण्यात आले आहे. संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांना संघात घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये शतक झळकविणाऱ्या नितीशकुमार रेड्डीच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने पाच कसोटी सामन्यात 298 धावा करत 5 विकेट्सही घेतल्या होत्या. तर फिरकी गोलंदाज अक्षर पटेलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
भारतीय संघ
संजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव-कर्णधार, अक्षर पटेल-उपकर्णधार, तिलक वर्मा, नितीशकुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.
A look at the Suryakumar Yadav-led squad for the T20I series against England 🙌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nrEs1uWRos
— BCCI (@BCCI) January 11, 2025