Download App

टीम इंडियाचे वर्षभराचे शेड्यूल जारी; जाणून घ्या, कधी अन् कुठे होणार सामने?

2025-26 या वर्षात टीम इंडियाला काही वनडे सीरीज खेळायच्या आहेत. या मालिकेत रोहित आणि विराट कधी खेळताना दिसतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Team India ODI 2025-26 Schedule : भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि (Rohit Sharma) धडाकेबाज फलंदाज विराट कोहली या (Virat Kohli) दोघांनीही कसोटीत निवृत्ती जाहीर केली आहे. आता हे दोन्ही स्टार खेळाडू फक्त एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसतील. 2025-26 या वर्षात टीम इंडियाला (Team India) काही वनडे सीरीज खेळायच्या आहेत. या मालिकेत रोहित आणि विराट कधी खेळताना दिसतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊ या भारतीय संघाचं वेळापत्रक..

इंडियन एक्सप्रेसनुसार भारतीय संघाला 2025-26 या वर्षात एकूण 9 एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. या मालिकेत प्रत्येकी तीन सामने असतील. म्हणजेच एकूण 27 सामने असतील. ऑगस्ट महिन्यात बांग्लादेश विरुद्ध मालिका आहे. या मालिकेची सुरुवात 17 ऑगस्टपासून होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही या मालिकेत खेळताना दिसतील. यानंतर ऑक्टोबर महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका होईल. पुढे नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामने होणार आहेत. म्हणजेच या वर्षात भारतीय संघाला एकूण 9 वनडे सामने खेळायचे आहेत.

टीम इंडिया तीन महिने फुल पॅक, मायदेशात ‘या’ संघांना देणार टक्कर; सामन्यांचे शेड्युल जारी

भारतीय संघाचे वनडे वेळापत्रक

ऑगस्ट 2025 – बांग्लादेश वि. भारत (17-23 ऑगस्ट)

ऑक्टोबर 2025 – ऑस्ट्रेलिया वि. भारत (19-25 ऑक्टोबर)

नोव्हेंबर-डिसेंबर 2025 – दक्षिण आफ्रिका वि. भारत (30 नोव्हेंबर-6 डिसेंबर)

जानेवारी 2026 – न्यूझीलंड वि. भारत

जून 2026 – अफगाणिस्तान वि. भारत

सप्टेंबर 2026 – वेस्टइंडिज वि. भारत

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 – न्यूझीलंड वि. भारत

डिसेंबर 2026 – श्रीलंका वि. भारत

कसोटीमधून निवृत्ती आता भारतासाठी कधी खेळणार रोहित-कोहली, जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

follow us