टीम इंडिया तीन महिने फुल पॅक, मायदेशात ‘या’ संघांना देणार टक्कर; सामन्यांचे शेड्युल जारी

टीम इंडिया तीन महिने फुल पॅक, मायदेशात ‘या’ संघांना देणार टक्कर; सामन्यांचे शेड्युल जारी

Team India Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या आगामी सामन्यांचे वेळापत्रक (Team India Schedule) जाहीर केले आहे. या वर्षात भारतीय संघाला मायदेशात वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या (South Africa) संघाबरोबर मुकाबला करायचा आहे. या दोन्ही स्पर्धांचे शेड्युल कसे असेल याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात वेस्टइंडिज संघ भारताच्या दौऱ्यावर येईल. सन 2018 नंतर पहिल्यांदाच वेस्टइंडिज भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे.

यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारतात येणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांदरम्यान स्पर्धा होणार आहे. म्हणजेच एकूण 79 दिवसांत भारतीय संघ या दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम विरुद्ध एकूण 12 सामने खेळणार आहे.

वेस्टइंडिज विरुद्ध मालिकेचे वेळापत्रक

वेस्टइंडिज विरुद्ध (West Indies) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 2 ऑक्टोबर पासून होणार आहे. पहिला सामना 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होईल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होईल.

मोठी बातमी : चॅम्पियन्स बनलेल्या टीम इंडियासाठी BCCI नं उघडली तिजोरी; जाहीर केलं 58 कोटींचं बक्षीस

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेचे वेळापत्रक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीतील (New Delhi) अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दुसरा कसोटी सामना 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी येथे होणार आहे. यानंतर दोन्ही संघांत तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे.

पहिला वनडे सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची शहरात होईल. दुसरा एकदिवसीय सामना 3 डिसेंबर रोजी छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये (Raipur) होईल. तसेच तिसरा आणि शेवटचा सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल.

यानंतर दोन्ही संघांदरम्यान पाच टी 20 सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. पहिला सामना 9 डिसेंबर रोजी कटक येथे होईल. दुसरा सामना 11 डिसेंबरला चंदिगढ, तिसरा सामना 14 डिसेंबरला धर्मशाळा, चौथा सामना 17 डिसेंबरला लखनऊ येथे तर पाचवा सामना 19 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल.

टीम इंडिया चॅम्पियन फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद

follow us
  • fb
  • instagram
  • youtube