Ind vs Ban Series Schedule: पुन्हा एकदा भारताचा महिला क्रिकेट संघ (India women cricket team) ॲक्शनमध्ये दिसणार आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ 28 एप्रिल ते 9 मे या दरम्यान बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) पाच टी-20 सामन्यांची मालिका (Ind vs Ban T20 Series) खेळणार आहे. सोशल मीडियावर बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली असून या मालिकेचा संपूर्ण शेड्यूलही जारी करण्यात आला आहे.
शेड्यूलनुसार भारतीय संघ बांगलादेशला 23 एप्रिल रोजी पोहोचणार असून या मालिकेचा पहिला सामना 28 एप्रिलला होणार आहे. तर दुसरा सामना 30 एप्रिलला आणि तिसरा सामना 2 मे रोजी होणार आहे तर चौथा सामना 6 मे आणि या मालिकेचा शेवटचा सामना 9 मे रोजी होणार आहे.
तर या मालिकेत पहिला, दुसरा व पाचवा सामना डे – नाईट (Day-Night) स्वरूपात खेळवण्यात येणार आहे आणि तिसरा व चौथा सामना दिवसा होणार आहे. पाचीही सामने एकाच स्थळावर म्हणेजच सिलहट (Sylhet) येथे होणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेनंतर 10 मे रोजी भारतीय महिला संघ बांगलादेश येथून भारताकडे रवाना होईल.
काँग्रेसमधून संजय निरुपम यांची हकालपट्टी; ‘या’ पक्षात करणार प्रवेश
भारत-बांगलादेश टी-20 मालिकेचे शेड्यूल
पहिला सामना – 28 एप्रिल (डे – नाईट )
दुसरा सामना – 30 एप्रिल (डे – नाईट )
तिसरा सामना – 2 मे
चौथा सामना – 6 मे
पाचवा सामना – 9 मे (डे – नाईट )
Google डिलीट करणार तुमचा डेटा, क्रोम युजर्स सावधान!