स्मृती मानधनाकडे BCCIने दिली मोठी जबाबदारी, टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

भारतीय संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. तिने विश्वचषक प्रतिका रावलची जागा घेतली होती.

News Photo   2025 12 09T223632.706

News Photo 2025 12 09T223632.706

डिसेंबरमध्ये पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेची महिला क्रिकेट टीम भारतात दौरा करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली असून, वनडे विश्वचषक (India) जिंकल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय महिला संघ मैदानात उतरणार आहे. यामध्ये हरमनप्रीत कौरला कर्णधार तर स्मृती मानधनाला उपकर्णधार करण्यात आलं आहे.

सामन्यांचे आयोजन विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे केले जाणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय संघात दोन नव्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. गुनालन कमालिनी आणि वैष्णवी शर्मा यांची पहिल्यांदाच टी-20 संघात निवड करण्यात आली आहे. राधा यादव आणि उमा छेत्रीची जागा त्याने घेतली आहे. राधा आणि उमा या दोघी महिला वनडे विश्वचषक संघाचा भाग होत्या. संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार असून स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून काम पाहणार आहे.

भारतीय संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. तिने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावलची जागा घेतली होती. भारत–श्रीलंका यांच्यातील ही पाच सामन्यांची मालिका महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 हंगामाच्या सुरूवातीच्या अगोदर आयोजित केली गेली आहे. डब्ल्यूपीएलचा पुढील सत्र 9 जानेवारीपासून नवी मुंबईत सुरू होणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांनी शेवटचा टी-20 सामना ऑक्टोबर 2024 मध्ये विश्वचषकादरम्यान खेळला होता. डिसेंबरमध्ये होणारी भारत–बांगलादेश सीमित षटकाची मालिका स्थगित झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्धची ही द्विपक्षीय मालिका निश्चित करण्यात आली.

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), श्री चरणी, वैष्णवी शर्मा.

Exit mobile version