Zaheer Khan Marathi Speech: महाराष्ट्रातील बीड (Beed News ) शहरात नव्या स्टेडियमची घोषणा मंत्र्याने केली आहे. ‘नाथ प्रतिष्ठान’ आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयासमोर सुरू असलेल्या नामदार चषक स्पर्धेचा आज फायनल सामना होता. जेकेसीसी विरुद्ध जय श्रीराम या दोन संघात फायनल सामना झाला, यामध्ये जय श्रीराम संघाने हा सामना दोन विकेटने जिंकला. या सामन्यावेळी युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि जहीर खान (Zaheer Khan) उपस्थित होते. यावेळी जहीर खानने मराठीत भाषण करून परळीकरांच (Parli) मनं जिंकल आहे.
जहीर खान नेमकं काय म्हणाला…: मी मराठीच बोलणार आहे, मराठी बोलण्याचा प्लॅन केला आहे. खेळाडू युवराज सिंग यांना परत जाऊन सांगणार आहे की, तुमच्यासोबत भाषणात काय काय बोल आहे. आम्हाला फार आनंद आहे, मला आणि युवराजला कारण इकडं येऊ शकलो, थोडं असं वाटलेलं की, कॅन्सल होऊ शकत. पण ख़ुशी आहे की, आम्ही इकडं येऊ शकलो. आज जे मला मॅचचेस वगरे जे चालू होते, इकडं जे क्रिकेट चालू होत, ते बघून फार आनंद झाला, आणि थोडेफार कुठे ना कुठे जशी की माझ्या क्रिकेटची सुरुवात होती. तुम्हाला तर माहितीच आहे की मी श्रीरामपूरचा आहे.
.. तर असे तोरणामेन्ट मी भरपूर खेळायचो. तर कुठे ना कुठे मला थोडी ती आठवण येत होती. माझं क्रिकेटचं जर्नी सुरु झालं होत. म्हणूनच ऐकून फार बरं वाटलं की, इकडं धनंजयजी मुंडे साहेबानी आजच्या दिवशी जेव्हा आम्ही आलोय इकडे तेव्हा क्रिकेट स्टेडियमची देखील घोषणा केली आहे, आणि ते ऐकून मला खूप चांगलं वाटलं, टेनिस बॉलनी सुरुवात केला याचा अर्थ असा नाहीय की, तुम्ही वरच कर्केत खेळू नाही शकत किंवा क्रिकेट बॉलनी खेळू नाही शकत. त्याच्यासाठी फक्त सुविधा पाहिजे असतात. तर इकडे परळी शहराला जर अशा सुविधा मिळतील तर जरूरच जे इकडचे क्रिकेटर आहेत. त्यांना एक प्लेटफॉर्म त्यांना एक संधी जरूर मिळेल असं वाटत की, वरच क्रिकेट खेळायचं, आजून चांगलं खेळायचं आणि आपलं नाव करायचं आपल्या शहराचं नाव करण्याची संधी जरूरच मिळेल, तर त्याबद्दल सर्वाना ऑल द बेस्ट सांगतो, आणि सर्व क्रिकेटर खेळाडूंना मेहनत करा आणि जेवढे टीम्स या तोरणामेन्ट मध्ये सहभाग झालेले आहेत. अभिनंदन करतो. अशा शुभेच्छा परळीकरांना खेळाडू झहीर खाननं मराठीतून दिल्या आहेत, त्यामुळे झहीर खाननं परळीकरांची मनं जिंकली आहेत.
शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा डाव सावरला
या कार्यक्रमाला खेळाडू युवराज सिंग, झहीर खान आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एक लाखाचे बक्षीस देऊन या टीमचं अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत उभारणार स्टेडियम 65 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू झहीर खान आणि युवराज सिंह यांनी या सामन्याला आपली उपस्थिती लावली होती.