Beed News ‘या’कारणामुळे ‘विड्या’तील २०० जावई झाले भूमिगत!
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील तब्ब्ल २०० जावई हे भूमिगत झाल्याचे समोर आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बीड जिल्ह्यातील विडा येथे निजामाच्या काळापासून एक अनोखी परंपरा जोपसली जात आहे. त्यात धुलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंगळवारी (दि. ७) रोजी धुलिवंदन असल्याने जवळपास २०० जावई हे भूमिगत झाले असून त्यांच्या शोधासाठी गावातील तरुणांचे पथक तयार करण्यात आले आहे.
Sanjay Shirsat हे असले कसले शिवसैनिक… इम्तियाज जलील यांनी उडवली खिल्ली!
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावाची ७ हजाराहून अधिक लोकसंख्या आहे. या गावात जवळपास २०० जावई राहतात. मात्र, धुलिवंदन सणाच्या दिवशी अनोख्या परंपरेमुळे ते सर्व जण भूमिगत झाले आहेत. विडा गावाच्या वेशीजवळ दक्षिणमुखी मंदिर आहे. या गावाने मध्ययुगीन संस्कृतीची परंपरा जोपासली आहे. दरवर्षी धुलीवंदन सणाला जावयांची वाजत-गाजत गावातून गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते. जवळपास १०० शंभर वर्षांपासून विडा गावाने ही परंपरा जपली आहे.
धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुणांचे पथक स्थापन करून ‘जावई शोध समिती’ नेमली जाते. जावयांना या समितीच्या निगराणीखाली ठेवण्यात येते. तर प्रत्यक्ष धुळवडीच्या दिवशी या जावयांना सकाळी ग्रामपंचायत समोर चपलेचा हार घालून गाढवावर बसवून दुपारपर्यंत रस्त्यावरून मिरवणूक काढली जाते. दुपारी हनुमान मंदिर येथे लोकवर्गणीतून जमलेल्या पैशातून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर या जावयांना केला जातो. तसेच सासऱ्याकडून सोन्याची आंगठी भेट दिली जात आहे.