Download App

विजयासाठी 193 धावांचं आव्हान; इंग्लंडला टीम इंडियाने 192 धावांवर गुंडाळलं

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात 62.1 ओव्हरमध्ये 192 धावांवर गुंडाळलं

  • Written By: Last Updated:

 ENG vs IND : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत इंग्लंडला लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात 62.1 ओव्हरमध्ये 192 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे भारताला 200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य मिळालं. इंग्लंडने टीम इंडियासमोर तिसऱ्या कसोटी सामन्यातील (ENG vs IND) चौथ्या दिवशी विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताकडे 100 पेक्षा अधिक षटकं आहेत. अशात टीम इंडिया हा सामना किती विकेट्सने जिंकते? याकडे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या सत्रात वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले. पहिला, त्याने जो रूटला आऊट केले. तो 96 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 40 धावा करू शकला. त्यानंतर त्याने जेमी स्मिथला आऊट केले. तोही आठ धावा केल्यानंतर बाद झाला होता. त्याआधी, इंग्लंडने सुरुवातीच्या सत्रात चार विकेट्स गमावल्या होत्या. सध्या बेन स्टोक्स 83 चेंडूत 27 धावा आणि ख्रिस वोक्स 23 चेंडूत 8 धावा करत खेळले. सहा विकेट्स गमावल्यानंतर इंग्लंडने भारतावर 175 धावांची आघाडी घेतली होती.

 

follow us