Download App

तिन्ही फॉरमॅटसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, सिनियर खेळाडूंना विश्रांती

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना या महिन्यात भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेत ते पुनरागमन करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे या मालिकेचे यजमानपद आहे.

या दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबर रोजी डर्बनमध्ये पहिल्या टी-20 सामन्याने होईल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, कर्णधार टेम्बा बावुमा आणि कागिसो रबाडा या खेळाडूंना मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. यानंतर हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेत पुनरागमन करतील.

एडन मार्कराम कर्णधार
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तयारीत व्यस्त आहेत. उभय संघांमधला पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. टेंबा बावुमाच्या अनुपस्थितीत, मर्यादित षटकांच्या मालिकेत एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करेल. आतापर्यंत एक वनडे आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला यष्टिरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे, तर हेनरिक क्लासेनला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.

ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली
वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी, मार्को जॅन्सन आणि लुंगी एनगिडी यांनाही वनडेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. या तिन्ही खेळाडूंचा पहिल्या दोन टी-20 सामने आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या वनडे संघात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे.

Uddhav Thackeray : अमित शहांवर येणार निवडणूक बंदी? बाळासाहेबांच्या कारवाईचा दाखला देत ठाकरेंनी घेरलं

नवीन खेळाडूंना संधी मिळाली
यामध्ये वेगवान गोलंदाज ओटनीएल बार्टमन आणि अष्टपैलू मिहलाली मपोंगवाना या नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅम (कसोटी) आणि वेगवान गोलंदाज नांद्रे बर्जर (तीन्ही फॉरमॅट) यांनाही पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी भारताने आपला संघ जाहीर केला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला मर्यादीत षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

तिन्ही फॉरमॅटसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
टी20 संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी (पहिली आणि दुसरी टी-20), डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन (पहिली आणि दुसरी टी20), हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी (पहिली आणि दुसरी टी20), अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स.

Rockstar DSP: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते रॉकस्टार डीएसपीसाठी 2024 ठरणार खास !

एकदिवसीय संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रॅसेन डुसेरे, रॅसेन आणि लिझाद विल्यम्स.

कसोटी संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, के ट्रिस्टन, के स्टिल वेरीन.

follow us