बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; A+ श्रेणीतील खेळाडूंना बसणार धक्का

यादी जाहीर झाल्यावर खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दुसऱ्या श्रेणीत अर्थात थेट B मध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे.

News Photo   2026 01 20T145322.977

बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; A+ श्रेणीतील खेळाडूंना बसणार धक्का

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट बोर्ड एक अत्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (BCCI) ज्यामध्ये अनेक A+ श्रेणीतील खेळाडूंना धक्का बसू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आपल्या नवीन केंद्रीय करार प्रणालीतून A+ श्रेणी काढणार आहे. A+ मध्ये सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराहसारखे काही खेळाडू आहेत, ज्यांना मोठा धक्का बसून शकतो.

2025-2026 चे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर झाल्यावर खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दुसऱ्या श्रेणीत अर्थात थेट B मध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने चार स्तरीय वार्षिक रिटेनरशिप प्रणालीमधून A+ श्रेणी काढून टाकण्याचा थेट सल्ला दिला आहे. ज्यामुळे भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंना धक्का बसू शकतो.

मुळात म्हणजे बीसीसीआयने अजून तरी कोणत्याही वरिष्ठ खेळाडूसोबत करार केला नाहीये. निवड समितीच्या प्रस्तावावर मंडळाच्या पुढील परिषद बैठकीत चर्चा केली जाईल. ही फक्त तशी मंडळाकडे शिफारस करण्यात आली. निर्णय शेवटी बैठकीत होईल. बीसीसीआयचा एकून चार श्रेणी आहेत, त्यानुसार खेळाडूंना श्रेणीत ठेवले जाते आणि मानधन दिले जाते. A+ वाल्या खेळाडूला सर्वाधिक मानधन बीसीसीआय देते.

गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

A+, A, B आणि C याप्रकारे खेळाडूंची श्रेणी तयार करण्यात आली. A+ च्या खेळाडूला बीबीआय 7 कोटी देते. A श्रेणीतील खेळाडूला बीसीसीआय 5 कोटी देते, B श्रेणीतील खेळाडूला 3 कोटी देते आण C श्रेणीतील खेळाडूला 1 कोटी देते. हे करार प्रत्येक वर्षाला केली जातात. बऱ्याचदा खेळाडूंच्या श्रेणीतील बदलताना दिसतात.

विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह हे खेळाडू सध्या A+ मध्ये आहेत, त्यांना बीसीसीआयकडून दरवर्षाला 7 कोटी मिळतात. ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, मोहम्मद शमी हे A श्रेणीत असून बीसीसीआय त्यांना 5 कोटी रूपये देते. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल,कुलदीप यादव हे खेळाडू B श्रेणीत असून बीसीसीआय त्यांना दरवर्षाला 3 कोटी देते.

C श्रेणीतील खेळाडंच्या नावाची यादी अत्यंत मोठी आहे. रुतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, शिवम दुबे, रजत पाटीदार, रिंकू सिंग, टिळक वर्मा, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप यासह अजून काही नावांचा या श्रेणीत समावेश आहे. मात्र, A+ श्रेणी बंद केली तर काही दिग्गज खेळाडूंना धक्का बसू शकतो.

Exit mobile version