T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी ( T20 World Cup 2024) बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणार आहे.
साखळी फेरीत भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे तर 12 जून रोजी भारतीय संघ अमेरिकेशी भिडणार आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे. कारण अमेरिकन संघात भारतीय वंशाचे काही खेळाडू खेळणार आहे जे रोहित सेनेसाठी धोका बनू शकते. चला मग जाणून घेऊया अमेरिकन संघात भारतीय वंशाच्या त्या खेळाडूंबद्दल जे भारतीय संघासाठी धोका बनू शकतात.
Milind Kumar
T20 विश्वचषकामध्ये अमेरिकन संघात दिल्लीत जन्मलेला भारतीय वंशाचा खेळाडू मिलिंद कुमार देखील खेळताना दिसणार आहे. मिलिंद कुमार भारतीय संघासाठी धोका बनू शकतो. मिलिंद कुमारने आतापर्यंत 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2988 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सचाही भाग तो राहिला आहे.
Harmeet Singh
मिलिंद कुमार नंतर भारतीय संघासाठी मुंबईत जन्मलेला हरमीत सिंग देखील धोका बनू शकतो. हरमीतने भारतासाठी दोन अंडर-19 विश्वचषक खेळले आहे. 2012 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भागही होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 87 विकेट्स घेतल्या आहेत.
Monank Patel
12 जून रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघासाठी यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल देखील धोका बनू शकतो. मोनांक पटेल भारतीय वंशाचा खेळाडू असून त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 47 सामन्यात 1446 धावा आणि 23 टी-20 सामन्यात 387 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक
5 जून – टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड
9 जून – टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
12 जून – टीम इंडिया विरुद्ध यूएसए
15 जून – टीम इंडिया विरुद्ध कॅनडा
पोर्टरचा नवा विक्रम, ठरली वर्षाची तिसरी युनिकॉर्न कंपनी
T20 World Cup 2024 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद