IPL 2027 मधून ट्रेविस हेडची अचानक माघार ; सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का

IPL 2027 : पुढील काही दिवसात आयपीएल 2027 साठी खेळाडूंचा लिलाव होणार असून तर आज संध्याकाळपर्यंत सर्व संघ मालक रिटेन आणि रिलीज खेळाडूंची

IPL 2027

IPL 2027

IPL 2027 : पुढील काही दिवसात आयपीएल 2027 साठी खेळाडूंचा लिलाव होणार असून तर आज संध्याकाळपर्यंत सर्व संघ मालक रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे मात्र त्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेडने आयपीएल 2027 मधून माघार घेतली आहे. पुढील वर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हेडने वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. हेडने घेतलेल्या या निर्णयामुळे आता आयपीएल 2027 मध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडची जोडी दिसणार नाही.

‘क्रिकइन्फो’ (Cricinfo) ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) संघ व्यवस्थापनाला कळवले आहे की तो आगामी हंगामात उपलब्ध नसेल. अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे (वर्कलोड) व्यवस्थापित करण्याच्या उद्देशाने हेडने हा निर्णय घेतला आहे.

हैदराबाद रिलीज करणार?

आयपीएल 2027 (IPL 2027) साठी खेळाडूंना संघात रिटेन आणि रिलीज करण्याबाबत निर्णय घेण्याची आज अंतिम मुदत आहे. आज संध्याकाळपर्यंत सर्व फ्रँचायझी आपापल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. त्यामुळे हैदराबाद संघ ट्रॅव्हिस हेडला रिलीज करतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जर हैदराबादने हेडला रिलीज केलं नाही तर त्यांना 14 कोटी रुपयांचा मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे आता अभिषेक शर्मासोबत हैदराबादला नवीन फलंदाजचा शोध घ्यावा लागणार आहे. अभिषेक शर्मासह आता ईशान किशन सलामीला येऊ शकतो किंवा 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात हैदराबाद नवीन खेळाडूला संघात सहभागी करू शकतो.

राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय; सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा होणार-

ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी आधीच दिले होते संकेत

या हंगामातील आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सहभाग अनिश्चित असल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडू कदाचित आयपीएलला कमी प्राधान्य देऊ शकतात. ऑस्ट्रेलियाला यावर्षी एकूण 20  कसोटी सामने खेळायचे आहेत.

Exit mobile version