Download App

बांगलादेश दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन! भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

U19 Asia Cup Final Highlights: UAE मध्ये खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला.

  • Written By: Last Updated:

U19 Asia Cup Final Highlights: UAE मध्ये खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघाने रविवारी मोठा पराक्रम केला. अंडर-19 आशिया चषक 2024 च्या अंतिम फेरीत बांगलादेशने (Bangladesh) भारताचा 59 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांमधील हा अत्यंत कमी धावसंख्येचा सामना होता आणि बांगलादेश संघाने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

बांग्लादेश दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन! भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद 

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे बांगलादेशचा डाव 198 धावांत रोखण्यात भारतीय संघाला यश आले. भारताकडून युधाजित गुहा, चेतन शर्मा आणि हार्दिक राज यांनी 2-2 बळी घेतले. तर किरण चोरमले, केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. तर बांगलादेशकडून रिझान हसनने 47 धावा केल्या. मोहम्मद शिहाब जेम्सनेही 40 धावांचे योगदान दिले. फरीद हसननेही ३९ धावांची खेळी खेळली.

या अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर बांगलादेशने 199 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 35.2 षटकात केवळ 139 धावा करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

फडणवीसांसोबत व्यक्तिगत दुश्मनी नाही, तर केवळ तात्विक मतभेद; एकनाथ खडसेंचे संकेत? 

दरम्यान, बांगलादेश संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. ही स्पर्धा 1989 पासून खेळवली जात आहे. मात्र अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा जेतेपद पटकावणारा बांगलादेश हा दुसरा संघ ठरला आहे. यासोबतच टीम इंडियाने 8 जेतेपदांवर कब्जा केला आहे.

या दोन संघांव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने ही स्पर्धा 1-1 वेळा ही जिंकली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी, जेव्हा-जेव्हा भारतीय संघ अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला तेव्हा त्याने विजेतेपद पटकावले.

दोन्ही संघाची प्लेइंग 11
बांगलादेश अंडर-19 (प्लेइंग इलेव्हन): झवाद अबरार, कलाम सिद्दीकी एलिन, मोहम्मद अझीझुल हकीम तमीम (कर्णधार), मोहम्मद शिहाब जेम्स, मोहम्मद फरीद हसन फैसल (विकेटकीपर), देबाशीष सरकार देबा, मोहम्मद समीयन बसीर रातुल, मारूफ मृधा, मोहम्मद रिझान होसन, अल फहाद, इक्बाल हुसेन इमोन.

भारत अंडर-19 (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ के, मोहम्मद अमन (कर्णधार), केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), किरण चोरमले, हार्दिक राज, चेतन शर्मा, युधाजित गुहा.

follow us