T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. युगांडा क्रिकेट संघ (Uganda Cricket Team)टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरला आहे. तर दुसरीकडे झिम्बाब्वे संघ (Zimbabwe team)टी-20 वर्ल्डकप 2024 साठी अपात्र ठरला आहे. झिम्बाब्वे संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. युगांडाच्या दिलखेचक कामगिरीमुळेच झिम्बाब्वेला या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे.
रोहित पवार भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते; धनंजय मुंडेंनी सांगितला किस्सा
टी-20 वर्ल्डकप 2024 चं यजमानपद हे वेस्ट इंडिज (West Indies)आणि अमेरिका (America)यांच्याकडे संयुक्तपणे आहे. त्यामध्ये प्रवेश करणारा युगांडा हा संघ विसावा आणि शेवटचा संघ ठरला आहे. आफ्रिका विभागातील पात्रता फेरीतून नामिबियाने सलग पाच सामने जिंकून नामिबियाने सलग पाच सामने जिंकून वर्ल्डकपचं तिकीट पक्क केलं आहे.
🚨 Uganda create history 🚨
They have qualified for the #T20WorldCup 2024 and will become only the fifth African nation to feature in the tournament 🔥
Details 👉 https://t.co/TgLrh9MBxw pic.twitter.com/yxMyyTMd4K
— ICC (@ICC) November 30, 2023
युगांडाच्या आधी वेस्टइंडीज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगानिस्तान, बांग्लादेश, आयर्लंड, स्कॉटलँड, पापुआ न्यू गिनी, कनाडा, नेपाळ, ओमान आणि नामीबिया आदी संघांनी क्वालिफाय केलं आहे.
President Draupadi Murmu यांनी चौथऱ्यावर जात घेतले शनैश्वराचे दर्शन
आगामी काळात टी-20 वर्ल्डकप 3 जून ते 30 जून दरम्यान होणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा एकूण बाद फेरीसह तीन टप्प्यात होणार आहे. 20 संघांची पाच गटात विभागणी केली जाणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर-10 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, दहा संघ 5-5 च्या 2 गटांमध्ये विभागले जाणार आहेत. सुपर-10 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
आज झालेल्या सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामध्ये अल्पेश रामजानी ( 2-1), दिनेश नाक्रानी (2-16), हेनरी सेन्योंदो (2-10) व ब्रायन मसाबा (2-10) यांनी उत्तम गोलंदाजी करत रवांडाचा संपूर्ण संघ 18.5 षटकांमध्ये 65 धावांत तंबूत पाठवला.
रवांडाकडून एरिक डुसिंगिजिमानाने 19 व मुहम्मद नादीरने 11 धावा केल्या. प्रत्युत्तरात रोनक पटेलने 18 धावा करुन सलामीवीर सिमॉन सेसाझीसह 31 धावांची खेळी केली. त्यानंतर सेसाझी याने 26 आणि रॉजर मुसाकाने 13 धावा करत त्यांनी युगांडाकडे विजयश्री खेचून आणला. युगांडाने 8.1 षटकांत 1 बाद 66 धावा करुन विजय संपादित केला.