Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीसह तीन खेळाडू करणार भारतासाठी टी-20 पदार्पण

Vaibhav Suryavanshi : भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2026 नंतर पहिल्यांदाच टी20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. शुक्रवारपासून भारत

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi : भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2026 नंतर पहिल्यांदाच टी20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. शुक्रवारपासून भारत आणि आयर्लंड दरम्यान दोन टी20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतासाठी तीन खेळाडू पहिल्यादांचा मैदानात उतरु शकतात. यात आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीचा देखील समावेश आहे.  भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध 26 आणि 28 जून रोजी टी20 सामने खेळणार आहे. तर यानंतर पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे.  त्यामुळे आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारतासाठी वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेडगे आणि वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव पदार्पण करू शकतात.

वैभव सूर्यवंशीने श्रीलंका विरुद्धच्या त्रिकोणीय ‘ए’ मालिकेच्या अंतिम सामन्यात 11 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात 29 चेंडूंत 94 धावांची धडाकेबाज खेळी केली  ज्यामध्ये 10 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे भारताला अंतिम सामना सहज जिंकता आला. 26 जूनपासून सुरू होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.  इंग्लंड किंवा आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरू शकतो. हा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने वयाच्या 16 वर्षे आणि 205 दिवस इतक्या कमी वयात पदार्पण केले होते.

तर दुसरीकडे प्रिन्स यादवने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्याने त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संधी मिळाली आहे. प्रिन्स यादवने आयपीएल 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी 14 सामन्यांत 16 बळी घेत दमदार कामगिरी केली होती. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत देखील शानदार कामगिरी केल्याने आयर्लंडविरुद्ध तो टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळताना दिसू शकतो.

हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी उपलब्ध नसल्यामुळे भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेची निवड करण्यात आली आहे. शेडगेने अलीकडेच श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत ‘इंडिया ए’ संघासाठी चांगली कामगिरी केली. त्याने पाच डावांत 127 धावा केल्या आणि 23 षटके गोलंदाजी केली. 2024-25 हंगामात सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाचा तो एक महत्त्वाचा खेळाडू होता.

मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम-

आयर्लंड टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल,  रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, वैभव सूर्यवंशी, प्रिन्स यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

Exit mobile version