Video : जो रुटने घेतला भयानक कॅच, ऑस्ट्रेलियन फलंदाजही हैराण

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जो रूटने स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाचा सेट बॅट्समन मार्नस लबुशेनला झेल घेतल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मार्क वुडला हे यश मिळाले. आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (eng vs aus 5th ashes test match joe root take one handed stunner catch of marnus labuschagne […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जो रूटने स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाचा सेट बॅट्समन मार्नस लबुशेनला झेल घेतल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मार्क वुडला हे यश मिळाले. आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (eng vs aus 5th ashes test match joe root take one handed stunner catch of marnus labuschagne in 5th ashes test match)

खरं तर, इंग्लंडच्या जो रूटने शुक्रवारी पाचव्या आणि शेवटच्या ऍशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रूटने एका हाताने मार्नस लॅबुशेनचा अप्रतिम झेल टिपला. मात्र, असाच एक झेल विराट कोहलीने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात दुसऱ्या स्लिपमध्ये घेतला, परंतु रूटचा झेल भयानक होता.

हवेत उडी मारत रूटचा अप्रतिम झेल

43व्या षटकात मार्क वुडने लबुशेनला ऑफ-स्टंपवर चेंडू टाकला चेंडू बॅटच्या बाहेरील कट घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जो रूटकडे गेला. रूटने त्याच्या डावीकडे हवेत उडी मारली आणि एका हाताने अप्रतिम झेल घेतला. त्याच्या प्रयत्नामुळे फलंदाज मार्नस लॅबुशेन हा हैराण झाला. त्याचवेळी रूटच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाबद्दल इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले.

गदर 2 चं महाभारताशी आहे खास कनेक्शन; दिग्दर्शकांनी केला खुलासा…

हॅरी ब्रूकचे शतक हुकले

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 283 धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूकचे शतक हुकले. त्याने 85 धावांची खेळी खेळली. याशिवाय बेन डकेटने 47 धावांचे योगदान दिले. यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. मिचेल स्टार्कने चार विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवशी, वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावून 179 धावा केल्या होत्या.

Exit mobile version